Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

University of California Research : वर्क फ्रॉम होम मुळे उत्पादनक्षमतेत घट

by
August 12, 2023
in लाईफस्टाईल
A A
University of California Research : वर्क फ्रॉम होम मुळे उत्पादनक्षमतेत घट
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वॉशिंग्टन :- करोना महामारीच्या कालावधीमध्ये जगात सर्वत्रच वर्क फ्रॉम होम ही कार्य संस्कृती रूढ झाली आता करोना महामारी संपली असली तरीसुद्धा जगातील अनेक देशांमध्ये वर्क फ्रॉम होम ही कार्य संस्कृती चालूच आहे पण आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे वर्क फ्रॉम होममध्ये कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

मॅसाचूसेट्स स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनानंतर हे निष्कर्ष प्रदर्शित करण्यात आले आहेत या संशोधनाप्रमाणे वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत किमान 18% घट होत असल्याचे लक्षात आले आहे वर्क फ्रॉम होम संस्कृतीचा सर्वात जास्त फटका भारतीय कर्मचाऱ्यांना बसला असून त्यांच्या उत्पादन क्षमतेत तब्बल दोन तृतीयांश घट झाली आहे.

या संस्थच्या संशोधनांमध्ये हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले असले तरी छप्पन टक्के कर्मचाऱ्यांना असे वाटते की, वर्क फ्रॉम होम मुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाली आहे गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वर्क फ्रॉम होमचे प्राधान्य वाढू लागले आहे नेहमीपेक्षा कमी पगार मिळाला तरी चालेल पण आम्ही वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करायला तयार आहोत असा एक नवा ट्रेंड आता रूढ होत चालला आहे.

घरबसल्या काम केल्यामुळे चांगले काम केल्याचे समाधान मिळते असे अनेकांना वाटत आहे. कार्यालयात जाऊन काम करणारे कर्मचारी सहा ते आठ तास काम करत असतात पण वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे घरबसल्या अनेक कर्मचारी आठ तासापेक्षा जास्त आणि दहा ते बारा तास काम करत असतात असा दावाही काही कर्मचाऱ्यांनी केला आहे आणि कामाचे तास वाढल्यामुळेच त्यांची कार्यक्षमता आहे आणि उत्पादन क्षमता वाढली असल्यासही त्यांचे म्हणणे आहे.

The post University of California Research : वर्क फ्रॉम होम मुळे उत्पादनक्षमतेत घट appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar