पाणी हा मानवी आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. पाण्याविना माणूस जिवंत राहणेही अवघड आहे. असे असताना या पाण्याचे आरोग्य शास्त्रातही महत्त्व नसेल तर नवलच. खरं तर शरीर निरोगी राहण्यात पाण्याचा सहभाग मोठा आहे. केवळ पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असेल तर शरीर जवळ जवळ 50 टक्के निरोगी राहू शकते.र आपल्या आरोग्याची संजीवनी असलेल्या पाण्यासंदर्भातील काही समज गैरसमज आपल्याही मनात असतील ते दूर करूया…
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिणे चांगले असते. त्यामुळे पोट साफ राहते. पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी पडत नाही.
कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून प्यायल्यास टॉक्सिक एलिमेंट शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते.
अति प्रमाणात पाणी प्यायल्यास आरोग्य खराब होण्याची शक्यता असते.
तुम्हाला जास्त प्रमाणात चहा, कॉफी घेण्याची सवय असल्यास ग्रीन टी प्यावा. एनर्जी मिळते.
सॉफ्ट ड्रिंकपेक्षा कोमट पाणी, लिंबू पाणी प्यायल्याने एनर्जी लेव्हल वाढते व पचन क्रिया उत्तम राहण्यास मदत होते.
पाणी प्यायल्याने शरीरातील जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते.
ताप आल्यावर, काम जास्त केल्यावर, उष्ण वातावरणामध्ये, केस गळत असल्यास, तणाव असल्यास अशा वेळी पाणी जास्त पिऊ नये. शरीरासाठी हानिकारक असते.
अधूनमधून पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते.
कोमट पाणी प्यायल्यास पित्त व कफ दोष होत नाही.
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास सर्दी-ताप होण्याची शक्यता असते.
बायपास झालेल्या व्यक्तीने पाणी कमी प्यावे.
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने फॅट वाढते.
खरबूज, काकडी, आईस्क्रीम आदी खाल्ल्यास लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे सर्दी होण्याची दाट शक्यता असते.
जेवताना पाणी पिऊ नये. जेवण पचण्यास वेळ लागतो.