Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

UN Women Report: एआय आणि डीपफेकचा वाढता धोका; महिलांसाठी इंटरनेट होतंय अधिक असुरक्षित

by
May 1, 2026
in लाईफस्टाईल
A A
UN Women Report: एआय आणि डीपफेकचा वाढता धोका; महिलांसाठी इंटरनेट होतंय अधिक असुरक्षित
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

UN Women Report: तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन सोपं झालं असलं, तरी त्याचे काही गंभीर दुष्परिणामही आता समोर येत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या ‘यूएन वूमेन’ या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये इंटरनेटवर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची भीषण स्थिती उघड झाली आहे. विशेषतः एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि डीपफेकसारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलांना लक्ष्य केलं जात आहे.  (UN Women Report)

हा अहवाल ११९ देशांतील ६४१ महिलांवर केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. या महिलांमध्ये पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचा मोठा समावेश होता. या सर्वेक्षणातील निष्कर्ष खूपच चिंताजनक आहेत. जवळपास २७ टक्के महिलांना इंटरनेटवर अश्लील संदेश आणि अपमानास्पद फोटो पाठवले गेले. तसेच १२ टक्के महिलांचे खासगी फोटो त्यांच्या परवानगीशिवाय ऑनलाइन शेअर करण्यात आले. याशिवाय ६ टक्के महिलांना एआयद्वारे तयार केलेल्या खोट्या फोटो आणि व्हिडिओंचा (डीपफेक) त्रास सहन करावा लागला.

या अहवालानुसार, एआयमुळे गुन्हेगारांना महिलांना त्रास देणं अधिक सोपं झालं आहे. काही टेक कंपन्या नफा मिळवण्यासाठी अशा प्लॅटफॉर्म्सची रचना करतात, जिथे द्वेषपूर्ण आणि अपमानास्पद कंटेंट वाढतो. याचा थेट परिणाम महिलांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांच्या अधिकारांवर होतो.  (UN Women Report)

 

ऑनलाइन होणाऱ्या या छळाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. अहवालानुसार, सुमारे २४ टक्के महिला नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्यांना सामोरं जात आहेत, तर १३ टक्के महिलांना मानसिक धक्का (पीटीएसडी) बसला आहे. या भीतीमुळे अनेक महिला सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करणं टाळत आहेत.

सुमारे ४१ टक्के महिलांनी ट्रोलिंग आणि अपमान टाळण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करणं बंद केलं आहे. याचा त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला आहे. जवळपास १९ टक्के महिलांनी आपल्या कामातही मागे राहणं पसंत केलं आहे. UN Women Report

या सगळ्यात आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे, महिलांना न्याय मिळण्यात येणाऱ्या अडचणी. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २५ टक्के महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, तर १५ टक्क्यांनी कायदेशीर मदत घेतली. मात्र, त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नाही. काही वेळा पोलिसांकडूनच महिलांना सोशल मीडिया वापरणं कमी करण्याचा सल्ला दिला जातो.

एकूणच, इंटरनेटवर वाढत चाललेली ही डिजिटल हिंसा महिलांच्या स्वातंत्र्यावर मोठा आघात करत आहे. भीतीमुळे महिला सार्वजनिक मंचांपासून दूर जात आहेत, जे समाजासाठीही धोकादायक आहे. महिलांचा आवाज दडपला जाणं म्हणजे समानतेच्या दिशेने जाणाऱ्या समाजासाठी एक मोठं पाऊल मागे जाणं ठरतं.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar