Tuesday, September 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या 4 सिक्रेट टिप्स नक्की लक्षात ठेवा, हॉस्पिटलमध्ये जायची वेळच येणार नाही; दुर्लक्ष केलं तर होईल गंभीर परिणाम

by
August 17, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Tukaram Mundhe : विकेंड आला की मित्रांसोबत हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन, कुटुंबासोबत डिनर, वाढदिवसाचं सेलिब्रेशन किंवा एखाद्या खास प्रसंगी बाहेर जेवण… आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हॉटेलिंग हा अनेकांच्या दिनक्रमाचा भाग बनला आहे.

टेबलवर पदार्थांची मोठी ऑर्डर येते, सुगंध दरवळतो आणि चवीच्या नादात आपण काय खातोय, ते कुठल्या परिस्थितीत तयार झालंय आणि हॉटेलमध्ये स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. पण एका अस्वच्छ किचनची किंमत दुसऱ्या दिवशी पोटदुखी, उलट्या-जुलाब किंवा फूड पॉइझनिंगच्या रूपात मोजावी लागू शकते.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अर्थात FDAच्या अन्नसुरक्षेविषयक कारवायांनी सध्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यव्यवसायांकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कार्यपद्धतीमुळे अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि खाद्यव्यवसायातील नियमपालन याबाबत चर्चा वाढली आहे.

एका मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी बाहेर जेवताना ग्राहकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले. म्हणजे हॉटेलमध्ये बसण्याआधी फक्त मेन्यू पाहू नका; आजूबाजूचं वातावरण आणि आपण काय ऑर्डर करतोय, याकडेही लक्ष द्या!

1. तेल, साखर, मीठ आणि मैद्याचे पदार्थ रोज नको!

हॉटेलमधील पदार्थ चविष्ट असतात; पण चव वाढवण्यासाठी त्यामध्ये तेल, मीठ, साखर किंवा चरबीचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे बाहेर जेवताना अशा पदार्थांचं प्रमाण मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

कधीतरी बाहेर खाणं आणि रोज बाहेरचं जास्त तेलकट-गोड-खारट अन्न खाणं यात मोठा फरक आहे. त्यामुळे पनीर, तळलेले पदार्थ, क्रीमयुक्त ग्रेव्ही, गोड पदार्थ, शीतपेय किंवा मैद्याचे पदार्थ यांचं अतिसेवन टाळणं योग्य ठरेल.

2. रेस्टॉरंटमध्ये बसण्याआधी स्वच्छता पाहा!

हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण सर्वात आधी मेन्यू कार्ड हातात घेतो; पण तुकाराम मुंढे यांच्या सूचनेनुसार हॉटेलचा परिसर आणि स्वच्छतेची स्थितीही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.

टेबल अस्वच्छ आहे का? भांडी नीट धुतलेली दिसतात का? अन्न उघड्यावर ठेवलेलं आहे का? माशा किंवा इतर कीटकांचा वावर आहे का? कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि अन्न हाताळण्याची पद्धत योग्य दिसतेय का? अशा गोष्टींकडे ग्राहकांनीही लक्ष द्यायला हवं. हॉटेल दिसायला महागडं आहे म्हणून ते आपोआप स्वच्छ असेलच असं नाही; स्वच्छता प्रत्यक्ष पाहणं महत्त्वाचं आहे.

3. हॉटेलचा FSSAI परवाना आहे का, हे तपासा!

तुम्ही ज्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता, त्या खाद्यव्यवसायाकडे आवश्यक FSSAI नोंदणी किंवा परवाना आहे का, याची माहिती घेणं ग्राहक म्हणून महत्त्वाचं आहे. FSSAIच्या नियमानुसार खाद्यव्यवसायांना त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार नोंदणी किंवा परवाना आवश्यक असतो. ग्राहकांनी उपलब्ध असल्यास संबंधित परवान्याची माहिती तपासू शकते.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परवाना आहे म्हणजे त्या ठिकाणी कधीही कोणतीही चूक होणार नाही, असा त्याचा अर्थ नाही. नियमित स्वच्छता, अन्नाची योग्य साठवणूक, तापमान नियंत्रण आणि अन्न हाताळण्याच्या पद्धती याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे.

4. वय आणि शरीराची गरज लक्षात घेऊन आहार निवडा!

तुकाराम मुंढे यांनी दिलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयानुसार आणि शरीराच्या गरजेनुसार आहाराची निवड. तरुण वयात सहज पचणारे काही पदार्थ वाढत्या वयात तितके सहज पचतीलच असं नाही. शरीराची ऊर्जा गरज, शारीरिक हालचाल, वजन, आरोग्यस्थिती आणि इतर वैयक्तिक घटकांनुसार आहाराच्या गरजा बदलू शकतात.

म्हणूनच बाहेर जेवताना फक्त ‘काय चविष्ट आहे?’ एवढाच विचार न करता ‘माझ्या शरीरासाठी काय योग्य आहे?’ याचाही विचार करायला हवा. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा इतर आरोग्यविषयक समस्या आहेत, त्यांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहाराची निवड करणं अधिक योग्य ठरेल.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar