Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Tuberculosis Rapid Test: काही तासांत क्षयरोगाचे निदान; चिरतरुण ठेवणाऱ्या औषधांवर संशोधन सुरू

by
February 25, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Tuberculosis Rapid Test: आरोग्य क्षेत्रात दोन महत्त्वाच्या संशोधनांमुळे आशादायक चित्र समोर आले आहे. पहिले संशोधन क्षयरोगाच्या जलद निदानासंबंधी आहे, तर दुसरे संशोधन वाढते वय कमी करण्याच्या औषधाबाबत आहे.

क्षयरोग हा भारतासह जगभरात मोठी समस्या आहे. अनेक रुग्णांचे वेळेवर निदान होत नसल्यामुळे उपचार उशिरा सुरू होतात. त्यामुळे आजार बळावतो आणि संसर्ग इतरांनाही होण्याचा धोका वाढतो. सध्या क्षयरोगाचे निदान करण्यासाठी थुंकीची तपासणी, रक्तचाचणी, छातीचा एक्स-रे, लसीका ग्रंथीची बायोप्सी, स्पायनल टॅप अशा अनेक चाचण्या कराव्या लागतात. या प्रक्रियेला काही दिवस ते काही आठवडे लागू शकतात.

मात्र आता अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी एक विशेष रक्तचाचणी विकसित केली आहे. या चाचणीमुळे काही तासांतच रुग्णाला क्षयरोग आहे की नाही हे समजू शकते, असा दावा संशोधक टोनी हू यांनी केला आहे. या नव्या तंत्रामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळू शकतील आणि संसर्गाचा प्रसारही कमी करता येईल. क्षयरोग निर्मूलनासाठी अमेरिका मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे. त्यामुळे ही नवी चाचणी आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरू शकते.

दरम्यान, चिरतरुण राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीही एक संशोधन चर्चेत आले आहे. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्स आणि अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूल येथील संशोधकांनी वाढते वय उलटवण्याबाबत प्रयोग केले आहेत. या संशोधनाचे नेतृत्व प्राध्यापक डेव्हिड सिनक्लेअर यांनी केले आहे.

संशोधनाच्या सुरुवातीला निकोटिनॅमाइड मोनोन्युक्लिओटाइड या संयुगाचा प्रयोग वृद्ध उंदरांवर करण्यात आला. त्यानंतर अवघ्या एका आठवड्यात त्यांच्या पेशींमध्ये तरुण उंदरांसारखे बदल दिसून आले. हे संयुग शरीरातील निकोटिनॅमाइड ॲडेनिन डायन्युक्लिओटाइड या महत्त्वाच्या घटकाची पातळी वाढवते. हा घटक डीएनए दुरुस्ती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो.

वय वाढल्यावर या घटकाची पातळी कमी होते आणि पेशींमध्ये नुकसान वाढते. डीएनएचे नुकसान हे वृद्धत्व आणि कर्करोगाचे एक मुख्य कारण मानले जाते. त्यामुळे या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवता आले तर वृद्धत्वाचा वेग कमी करता येऊ शकतो, असा संशोधकांचा दावा आहे.

या औषधाच्या मानवी चाचण्या बोस्टन येथील ब्रिगम अँड विमेन्स हॉस्पिटलमध्ये घेण्यात येणार आहेत. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास पुढील तीन ते पाच वर्षांत हे औषध बाजारात उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले जात आहे. मात्र सध्या बाजारात उपलब्ध असलेले कमी मात्रेतील पूरक घटक वृद्धत्व थांबवतात याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.

अंतराळ संशोधन संस्था नासालाही या संशोधनात रस आहे. कारण अंतराळवीरांना अवकाशातील किरणोत्सर्गामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत हे औषध उपयोगी पडू शकते.

एकीकडे क्षयरोगाचे जलद निदान आणि दुसरीकडे चिरतरुण ठेवणाऱ्या औषधावर संशोधन, या दोन्ही घडामोडींमुळे आरोग्य क्षेत्रात आशेचा किरण दिसत आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar