फॉर्मल्समध्ये व्यक्तिमत्त्व उठावदार दिसते. मात्र फॉर्मल्स कपड्यांवर काही बाबी अजिबात शोभत नाहीत. सूट घातल्यावर बॅगपॅकऐवजी ऑफिस सुटकेस वापरावी. बेल्ट आणि बूट एकाच रंगाचे वापरावे. सूट घालून कुठेही गेलात तरी खुर्चीवर बसताना नेहमी सूटची बटन काढून मगच बसा.
तसे न केल्यास सुटची इस्त्री खराब होण्याची शक्यता असते. तयार होताना कमीत कमी ऍक्सेसरीज वापरा. फॉर्मल्समध्ये टायसुद्धा महत्त्वाचा असतो. टाय आणि पॉकेट साइझ हा कधीच एकसारखा असू नये.
टाय हा वेगळ्या टेक्सचरचा असेल तर पॉकेट साइझचा पॅटर्न वेगळा ठेवा. सूटस घालताना त्याला बटणं किती असावी याचे लिखित नियम काही नसले तरी फॅशन सेन्स असलेली माणसं 2 बटणं लावतात.
कारण खूप बटणं असं हे सुट्सला अजिबात शोभत नाही आणि ते दिसायला सुद्धा खूप ऑड दिसतं. ट्राउझरचा बॉटम हा पायघोळ नसावा. एकदम शाइन करणारे किंवा झगमगीत शर्ट अजिबात घालू नका. फॉर्मल घातल्यानंतर उगाच उड्या मारत बसू नका. फॉर्मल घालेले व्यक्तिमत्त्व हे नेहमी शांत आणि आनंदी चेहऱ्याचे असते.