मुलगा किंवा मुलगी खूपच लहरीपणाने वागत आहे किंवा आत्मघातकी वर्तन करत आहे, असे लक्षात आल्यास पालकांनी त्वरित शाळेतील समुपदेशकांची किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. मात्र, त्याचवेळेस मुलांच्या स्वातंत्र्याचा मान ठेवणेही आवश्यक आहे. त्याला किंवा तिला सतत प्रश्न विचारणे किंवा दबाव आणणे योग्य नाही.
अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे मुले काहीशी तुटक झाली आहेत, ती आई-वडिलांना फार काही सांगत नाहीत. याच वेळी पालकांनी सावध होऊन मुलांमधील स्वत:ला इजा पोहोचवण्याची किंवा त्याहूनही वाईट म्हणजे आत्महत्येची काही लक्षणे ओळखली पाहिजेत. काही वेळा मुलांमध्ये नैराश्याच्या खुणा स्पष्ट दिसतात, पण पालक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा नेहमीसारखा लहरीपणा असेल असे म्हणून जाऊ देतात. न्यायालयात हजेरी लावावी लागणे, कौटुंबिक तणाव, परीक्षेचा किंवा समवयस्क मुलांमुळे येणारा ताण आदी कारणांमुळे तरुणांमध्ये आत्मघातकी लक्षणे दिसतात. यातील काहींचा लैंगिक छळ झालेला असतो किंवा काहींना प्रेमात अपयश आलेले असते.
मुलगा किंवा मुलगी खूपच लहरीपणाने वागत आहे किंवा आत्मघातकी वर्तन करत आहे असे लक्षात आल्यास पालकांनी त्वरित शाळेतील समुपदेशकांची किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. मात्र, त्याचवेळेस मुलांच्या स्वातंत्र्याचा मान ठेवणेही आवश्यक आहे. त्याला किंवा तिला सतत प्रश्न विचारणे किंवा दबाव आणणे योग्य नाही. त्यांच्या चिंता त्यांनी तुमच्याजवळ उघड कराव्यात म्हणून त्यांच्यावर दबाव आणला तर ते कदाचित वैतागतील आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी टोकाचे पाऊल उचलतील.
डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या मुलाला फार्माकोथेरपीची औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे ताण, नैराश्य आणि झोपमोडीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. आयुष्यातील आव्हानांचा सामना अधिक चांगल्या पद्धतीने कसा करायचा याचे समुपदेशन त्यांना द्यावे लागते आणि हे करण्यात कोणत्या प्रकारची मानसिकता अडथळा ठरते, हे ओळखण्यास सांगितले जाते. कुटुंबातल्या सदस्यांकरिता कुटुंब उपचार सत्रे घेतली जातात. तुमच्या जवळच्या लोकांचे आयुष्य सुधारायचे असेल, तर लक्षणे वेळीच लक्षात घेणे आवश्यक आहे.
मुलांवर लक्ष ठेवणे केव्हा आवश्यक आहे, हे ओळखण्यासाठी काही लक्षणे पुढीलप्रमाणे जेव्हा मुले मृत्यू किंवा मरण्याबद्दल वारंवार बोलतात किंवा अगदी नाहीसे होण्याबाबत किंवा उडी मारण्याबाबत किंवा स्वत:ला गोळ्या घालून घेण्याबाबत किंवा कोणत्याही स्वरूपातील स्वयं-ईजेबद्दल बोलतात. जेव्हा मुले मृत्यू किंवा घटस्फोटासारख्या परिस्थितिजन्य संकटामुळे त्यांची जवळची व्यक्ती गमावतात, नाते तुटल्यानंतरच्या काळातून जात असतात, जवळच्या मित्राला गमावून बसतात किंवा अन्य मित्रांना भेटण्यात अजिबात रस घेत नाहीत; तसेच पूर्वी त्यांना आवडणाऱ्या एखाद्या छंदात ते अजिबात रस घेत नाहीत तेव्हा व्यक्तिमत्त्वात झालेला आमूलाग्र बदल, निरिच्छता, नैराश्य, चिडचिडेपणा, उदासीनता, थकवा, निर्णय घेण्यात अडचणी अशी लक्षणे दिसत असतील तेव्हा, शाळा, कामाचे ठिकाण येथे साधी कामे करतानाही लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात तेव्हा, काही मुलांना अधिक झोप येते, तर काहींना झोप येत नाही आणि अनेकांना रात्री वाईट स्वप्ने पडतात.
तरुणांमध्ये झोपेत चालणे तसे सामान्य आहे, पण ही देखील एक शक्यता असू शकते. अंमलीपदार्थ किंवा मानसिक आजार नसूनही भ्रम होणे, हेही कारण असू शकते. आहाराच्या सवयींतील बदलांवरही लक्ष ठेवा. टोकाच्या मानसिक अवस्थेत काहीजण जास्त खातात तर काहींची भूक मरते.
मुले आत्मसन्मान हरवून बसतात. आपण अत्यंत निरुपयोगी, लाजिरवाणे आणि अपराधी आहोत, असे त्यांना दैनंदिन कामे पार पाडतानाही वाटते. स्वत:बद्दलचा तिरस्कार वाढीस लागला की, त्यांना वाटू लागते की ते आसपास नसतील, कोणत्या उपक्रमात सहभागी नसतील तर लोकांना अधिक चांगले वाटेल. गोष्टी कधीच सुधारणार नाहीत आणि काहीच कधीच बदल होणार नाही, असे त्यांना वाटते.
आत्महत्या टाळण्यासाठी…
असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सच्या अहवालानुसार, आत्महत्या ही सर्वाधिक धोकादायक आणि मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या असून, दरवर्षी 10 लाखांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू हा आत्महत्येच्या मार्गाने होतो. एक क्षण थांबा आणि आयुष्य बदलून टाका, हाच या समस्येवरचा खराखुरा उपाय आहे.
बराच काळ समाजाच्या विविध स्तरांना हलवून सोडणाऱ्या आत्महत्यांसारख्या या सामाजिक समस्येला समाजातून हद्दपार करण्यासाठी व सार्वजनिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी एओएच या संघटनेने सर्वसामान्य माणसांना एकत्र येऊन कार्य करण्याची विनंती केली आहे. सक्रियपणे समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे, सर्वाना त्यांच्या-त्यांच्या मनातील भीती आणि न्यूनगंड दूर करण्यासाठी मानसिक सहाय्य पुरवणे यांसारख्या उपक्रमांतून आत्महत्या विरोधी जागरूकता पसरवणे हे एओएचचे मुख्य उद्दिष्ट असून यामुळे सर्वसामान्यांची आयुष्ये बदलणार आहेत.
तणावापासून दूर राहण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी लोकांनी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. समस्यांचे निवारण नेमके कशाप्रकारे करता येईल, यावर लक्ष केंद्रित करून आपापल्या समस्यांविषयी इतरांशी चर्चा करणे आवश्यक असते. मानसिक आजारांवर मात करण्याबरोबरच नकारात्मक विचारही मनात येऊ देऊ नयेत.
तरुणांमध्ये ऑनलाइन राहण्याचे व्यसन फारच झपाट्याने वाढत चालले आहे. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण नाते प्रस्थापित करणे गरजेचे झाले असून, सतत त्यांच्या वागण्याचे परीक्षण करता कामा नये. ब्लू व्हेल गेममार्फत झालेल्या आत्महत्यांमागेही पालकांसोबतच्या संवादाचा अभाव हेच कारण आहे. जगभरातील ते वर्षे वयोगटातील मुलांच्या मृत्यूंमागे आत्महत्या हे सर्वात मोठे व महत्त्वाचे कारण आहे.
मन तणावमुक्त ठेवण्यासाठी काही टिप्स
तणाव निर्माण करणारे विचार ओळखा.
कुटुंबीय किंवा मित्रपरिवाराशी संवाद साधा.
तुमच्यासह झालेल्या सर्व सकारात्मक घटनांचा विचार करा.
मानसोपचार तज्ज्ञाची भेट घ्या. रुग्णाच्या आरोग्याप्रती तुम्हाला वाटत असलेली काळजी व्यक्त करा आणि अति काळजी करणेही टाळा.
ध्यानधारणा करा आणि एखादा छंद जोपासा.
– डॉ. चैतन्य जोशी