ऍलर्जीचा खोकला म्हणजे काय?
ऍलर्जीच्या खोकल्याचा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. साध्या सर्दीमुळे होणाऱ्या खोकल्याला ऍलर्जीचा खोकला म्हणतात. खोकल्यासोबत सर्दीही होत असल्याचे तुमच्या लक्षात येत असेल आणि नाक चोंदण्याचे प्रकारही घडू शकतात. ऍलर्जीच्या खोकल्यासोबत सायनस आणि मध्यकर्णाचा संसर्ग होऊ शकतो.
लक्षणे :
-एखाद्याला कोरडा खोकला होतो किंवा खोकल्यासोबत कफही बाहेर पडतो आणि पोलन सीझनमध्ये किंवा प्राणी असतील, तर ही लक्षणे अधिक दिसून येतात. त्याचप्रमाणे सतत शिंका, नाक चोंदणे, घसा बसणे, थकवा, डोळे चुरचुरणे किंवा पाणी येणे ही याची लक्षणे आहेत.
ऍलर्जीचा खोकला दूर ठेवण्यासाठी टिप्स…
-तुम्हाला ज्या घटकांची ऍलर्जी आहे, ते घटक तुम्ही टाळा किंवा आपल्या शरीरापासून लांब ठेवा. पोलन, बुरशी, प्राण्यांची विष्ठा, धुळीतील किड्यांपासून लांब राहावे.
-डॉक्टरांनी सुचविलेली औषधांमुळे भरलेले नाक, वाहणारे नाक आणि -नाकपुड्यांमधील सूज यांसारख्या लक्षणांपासून दिलासा मिळू शकतो.
-चोंदलेल्या आणि वाहणाऱ्या नाकापासून दिलासा मिळू शकतो.
-घराबाहेर पडताना तुम्ही तुमचा चेहरा झाकावा, जेणेकरून धूळ आणि परागकण टाळता येतील.
-तुम्ही त्वचेची किंवा रक्ताची चाचणी करूनही ही समस्या हाताळू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्की कशाची ऍलर्जी आहे ते समजेल.