[[{“value”:”
Tight clothing : आजकाल फॅशनचा क्रेझ सर्वांमध्येच पाहायला मिळतो. प्रत्येकाला स्टायलिश आणि ट्रेंडी दिसायचं असतं. काहींना लूज फिट कपडे आवडतात तर काहीजण बॉडी फिट कपड्यांना प्राधान्य देतात .
मग ती फिटेड जीन्स असो, लेगिंग्ज, बॉडीकॉन ड्रेस असो किंवा स्ट्रेचेबल टॉप. हे कपडे दिसायला आकर्षक आणि स्टायलिश वाटतात, पण तुम्हाला माहिती आहे का की दीर्घकाळ टाईट कपडे घालणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते? होय, हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे.
जर तुम्ही ऑफिस, कॉलेज किंवा वर्कप्लेसवर जाण्यासाठी दररोज टाईट कपडे घालता, तर सावध होण्याची गरज आहे. आज आपण जाणून घेऊया अशा कपड्यांमुळे शरीरावर कसे विपरीत परिणाम होतात.
संशोधन काय सांगतं?
टाईट कपडे आरामदायक असू शकतात, पण जेव्हा कपडे अंगावर घट्ट वाटू लागतात, तेव्हा ते शरीरासाठी त्रासदायक ठरतात. अशा वेळी त्वचेवर लालसर खुणा, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याचा सर्वाधिक परिणाम टाईट अंडरगार्मेंट्सवर दिसतो. जसे की शेपवेअर, पँटीहोज इत्यादी.
टाईट कपड्यांचा आरोग्यावर परिणाम :
टाईट कपडे जसे नेकटाय, बॉडीफिट आउटफिट्स किंवा स्ट्रेच कपडे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर्स वाढवू शकतात. अशा कपड्यांमुळे पोट आणि आतड्यांवर अतिरिक्त दाब येतो, ज्यामुळे ॲसिड रिफ्लक्स आणि हार्टबर्न सारख्या समस्या उद्भवतात.
लांब काळापर्यंत ॲसिड रिफ्लक्स राहिल्यास ‘इसोफॅजायटिस’ सारखी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे गिळताना वेदना होतात. जर तुम्हाला पोटफुगी (ब्लोटिंग) ची समस्या असेल, तर टाईट कपडे पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम करतात.
तसंच, टाईट पँट, पँटीहोज किंवा शेपवेअरमुळे श्वासोच्छ्वासाची क्षमता कमी होते. वर्कआउट करताना शरीरातून घाम निघतो आणि अशा वेळी टाईट कपडे घातल्यास त्वचेला संक्रमण होण्याचा धोका वाढतो.
काही संशोधनात असे आढळले आहे की टाईट बेल्ट किंवा जीन्समुळे ‘मेराल्जिया पॅरेस्थेटिका’ नावाचा स्पायनल नर्व्ह कंप्रेशन होऊ शकतो, ज्यामुळे मांडी सुन्न होणे, झिणझिण्या येणे किंवा जळजळ जाणवते.
व्यायामादरम्यान टाईट कपड्यांचा परिणाम :
२०२० मध्ये टोरोंटो विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, टाईट फिटिंग वर्कआउट कपडे महिलांच्या खेळातील कामगिरीवर परिणाम करू शकतात. तथापि, वर्कआउट करताना टाईट कपडे घालणे चुकीचं नाही, पण ते सर्वांसाठी सोयीचे असतीलच असं नाही.
हे पूर्णपणे व्यक्तीवर अवलंबून असतं जर तुम्हाला व्यायाम करताना टाईट कपडे आरामदायक वाटत असतील, तर तुम्ही ते नक्की घालू शकता. पण त्यासाठी योग्य काळजी देखील घेणे गरजेचे आहे.
The post Tight clothing : टाईट कपड्यांचा ट्रेंड ठरत आहे धोकादायक; महिलांनो आताच काळजी घ्या, अन्यथा होईल गंभीर आजार ! appeared first on Dainik Prabhat.
“}]]
