Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अभिनेत्रींच्या फिटनेसचं ‘हे’ आहे सीक्रेट

by प्रभात वृत्तसेवा
February 4, 2021
in फिटनेस
A A
अभिनेत्रींच्या फिटनेसचं ‘हे’ आहे सीक्रेट
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सुंदर दिसण्याची इच्छा सर्वांनाच आहे. हल्ली सुंदर दिसण्यासाठी लोक कृत्रिम सौंदर्यसाधनांनी पुष्कळ प्रयत्न करतात. आपण अधिकात अधिक सुंदर दिसावे अशी स्त्री व पुरुष समाजात एक प्रकारची चढाओढ लागली आहे. रंगीबेरंगी कपड्यांनी तयार केलेले आधुनिक पोषाख, केश रचना व साबण, तेल, स्नो, पावडर, क्रीम, लिपस्टिक इत्यादी शृंगार साधनांचा उपयोग आपण सुंदर दिसावे याकरिताच केला जातो. परंतु, हे सौंदर्य केवळ दिखाऊ आहे. शरीराचे वास्तविक सौंदर्य या साधनांमुळे वाढविता येते. कोणत्याही स्त्री-पुरुषांच्या सौंदर्याचे वर्णन त्यांच्या अंग-प्रत्यंग व रूपलावण्यावरून केले जाते. ( fitness freak in bollywood actress )

आपण प्रत्यक्ष पाहतो की, ज्याचे शरीर पिळदार व पुष्ट आहे अशा माणसाला पाहिल्यानंतर सर्वच लोक प्रभावित होतात व त्याच्यासारखे सुंदर शरीर बनविण्याची इच्छा उत्पन्न होते. व्यायामावाचून अशा प्रकारचे शरीर हे सुंदर व पिळदार होऊच शकत नाही. यात काहीच वादाचे कारण नाही. व्यायामामुळे मनुष्याच्या शरीराची वाढ होते व वजनही वाढते. वजन वाढल्याने शरीर भरदार होते व त्याची कोमलता वाढते. गौरवर्ण असेल तर बोलावयासच नको? काळ्या रंगाची माणसेसुद्धा फार सुंदर दिसतात. अशा प्रकारचे शरीरसौंष्ठव हेच नैसर्गिक सौंदर्य निदर्शक आहे. त्याला आणखी सजवून सुंदर करण्याची काय आवश्‍यकता आहे? म्हणून शरीराला कृत्रिम उपायांनी सुंदर करण्यापेक्षा व्यायामाने सुंदर बनविणे हाच उपाय योग्य आहे.

पूर्वी असे सांगितले जायचे की, जी शारीरिक क्रिया शरीराला स्थिर व दृढ करतात त्याचे नाव “व्यायाम’ होय.’ मूल जन्मापासूनच व्यायाम करते. रडून किंवा प्रसन्न होऊन जोरजोराने मूल हातपाय हालवित राहाते, हाच त्याचा व्यायाम होय. पुढे धावणे, उड्या मारणे व मुलांच्या बरोबर खेळणे हा त्याचा स्वाभाविक व्यायाम होय. या स्वाभाविक व्यायामासाठी नगरपालिका मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी बगीचे तयार करते. शाळांमधून ज्या कवायती (ड्रील) करतात; तो सुद्धा एक चांगला व्यायाम आहे. आता तर सरकारने शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांकरिता “सैनिकी शिक्षण’ आवश्‍यक केले आहे. सैनिकी शिक्षणात उत्तम व्यायाम करवून घेतात.

सर्व खेळ सुद्धा एक प्रकारचा व्यायामच आहे. नांगर चालविणे, फावड्याने खोदणे, लाकडे तोडणे, बागायती काम करणे इत्यादी व्यायामाचा दुहेरी उपयोग होतो. कोणतेही काम नियमितपणे केल्याने शारीरिक विकास होतो. देशाच्या अन्नोत्पादनात मदत होते. कुस्ती, दंड, बैठक, मुद्‌गल जोडी फिरवणे, सूर्यनमस्कार, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, हुतूतू , गिल्ली-दांडू, सिंगलबार, डबलबार, मल्लखांब, पोहणे, धावणे, घोड्यावर बसणे, नाव वल्हविणे, आसने व लेझिम, बोथाटी, फरीगदगा, लाठी फिरवणे इत्यादी सर्व व्यायाम आहेत. हे व्यायाम बरेच प्रचलित असून सर्व लोकांना परिचित आहेत.( fitness freak in bollywood actress )

Tags: aarogya jagar 2019aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRA
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar