मोबाईल ( mobile ) फोनमुळे एक प्रकारचं आभासी जग निर्माण होतं. तेच जग खरं आहे असं अनेकांना वाटू लागतं. पण हे जग कृत्रिम आहे, हे अखेर लक्षातच येत नाही. शेवटी वास्तव लक्षात घेणं गरजेचं आहे, संवाद साधण्याच्या साधनांमध्ये आपण कितीही प्रगती केलेली असली तरी ती पुरेशी नाही. अर्थपूर्ण आणि समोरासमोर होणाऱ्या संवादांची आज कमतरता भासत आहे. मोबाईल फोनमुळे हा समोरासमोर होणारा संवाद आजच्या काळात हरवला आहे, हे नक्की!
आपल्यापैकी अनेकांना जेव्हा उदासवाणं वाटू लागतं, मनात निराशा दाटून येते तेव्हा बरेचजण मन रिझवण्यासाठी स्मार्टफोनकडे वळतात. पण त्यामुळे गोष्टी आणखीच बिघडण्याची शक्यता असते. कारण नकारात्मक भावना कमी करण्यासाठी स्मार्टफोनचा काहीही उपयोग होत नाही. तात्पुरतं मन रमवण्यासाठी सतत मोबाईल फोनचा वापर करत राहिल्याने मानसिक अवस्था आणखी बिघडू शकते असं संशोधकांचं म्हणणं आहे.
मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधल्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आर्टसच्या प्राध्यापकांनी याबाबत नुकताच अभ्यास केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संवाद साधण्याच्या साधनांमध्ये आपण कितीही प्रगती केलेली असली तरी ती पुरेशी नाही. अर्थपूर्ण आणि समोरासमोर होणाऱ्या संवादांची आज कमतरता भासत आहे. मोबाईल फोनमुळे हा समोरासमोर होणारा संवाद हरवला आहे.
जे लोक व्यक्तींशी थेट संवाद साधण्यापेक्षा इलेक्टॉनिक साधनांचा (इमपर्सोनेट मेडिया ऑफ कम्युनिकेशन) वापर करून संवाद साधाण्याचा प्रयत्न करतात ते कायम असमाधानी राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. मोबाईल ( mobile ) फोनमुळे एक प्रकारचं आभासी जग निर्माण होतं. तेच जग खरं आहे असं अनेकांना वाटू लागतं. पण हे जग अखेर कृत्रिम आहे हे लक्षातच येत नाही. शेवटी वास्तव लक्षात घेणं गरजेचं आहे.
संशोधकांनी मोबाईलच्या अतिरिक्त आणि सततच्या वापरामागची दोन कारणं शोधून काढली. त्यापैकी एक म्हणजे टाईमपास करणं किंवा स्वत:ची करमणूक करणं आणि दुसरं म्हणजे स्वतःचा मानसिक तणाव घालवण्यासाठी इतरांशी बोलणं. वर नमूद केलेल्या कारणांपैकी दुसरं कारण हेच सर्व समस्यांचं मुख्य कारण बनलं आहे.
हल्ली जवळपास प्रत्येकजणच कोणत्यातरी मानसिक तणावाखाली असतो. मग हा मानसिक तणाव आणि नकारात्मक भावना यांवर मात करण्यासाठी मोबाईल ( mobile ) वापरण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. हे मोबाईलच्या अतिवापरास चालना देणारं ठरत आहे, असं संशोधकांना वाटतं. समोरासमोर संवाद साधण्यानं मोबाईलच्या अतिवापरावर नियंत्रण आणता येऊ शकेल आणि त्यामुळे निर्माण होणा-या नकारात्मक भावनाही कमी होण्यास मदत होईल असंही त्यांचं म्हणणं आहे.