मानवी हाडे ही वयानुसार कमकुवत होतात. त्यांच्यात कामं करण्यासाठी शक्ती उरत नाही. काही प्रकरणांमध्ये, हाडे खूप कमकुवत होतात आणि या अवस्थेस “ऑस्टिओपोरोसिस’ म्हणतात. यामुळे, हाडांचे फ्रॅक्चरदेखील होऊ शकतो आणि कधीकधी हाडे इतकी कमकुवत होतात की साधं पडलं तरी ते ब्रेक होण्याची भीती वाटते.
ऑस्टिओपोरोसिस हाडांची अशी अवस्था आहे ज्यामध्ये हाडांचे घनत्त्व कमी होते आणि त्या ठिसूळ होऊ लागतात. हाडे अशक्त होणे आणि परिणामी गुंतागुंतीनिर्माण होणे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिकमोठ्या प्रमाणात आहे. ऑस्टिओपोरोसिसच्या व्यापक कारणांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होणारे संप्रेरकांतील बदल, कॅल्शिअम आणि डी जीवनसत्वाची कमतरता आणि ज्यामुळे हाडे अशक्त होऊ शकतात.
ऑस्टिओपोरोसिस असलेल्या लोकांसाठी आरोग्याची सर्वात मोठी जोखीम म्हणजे इजांमुळे आणि पडल्यामुळे अस्थिभंग होणे ही आहे.
ऑस्टिओपोरोसिस असलेल्या लोकांमध्ये हाडे अशक्त असणे आणि वाकलेल्या हाडांमुळे शरिराची ढब विकृत असण्याचे खूप प्रमाण असते. संप्रेरक उपचार, आहारातील पूरके आणि स्वस्थ जीवनशैली ह्या मुख्य उपचारपद्धती आहेत.अगोदर निदान झाल्यास,हाडांची पुढील हानी टळू शकते आणि अस्थिभंगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. कॅल्शियमचे योग्य प्रमाणात सेवन न केल्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. तसेच इतर पोषक तत्वांचा अभाव देखील हाडांच्या कमकुवतपणास कारणीभूत ठरू शकतो. चला हाडे मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया …
सफरचंद
दररोज सफरचंद खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिसपासून आपण दूर राहू शकतो. वास्तविक, सफरचंदांमध्ये पॉलीफेनोल्स आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटी-ऑक्सिडंट असतात, जे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यासाठी साली काढून (सोलून) सफरचंद खाणे अधिक फायदेशीर आहे.
तीळ
आपल्या नेहमीच्या आहारात तिळाचा अवश्य समावेश करा. ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तीळांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडांसाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही रोज मुठभर भाजलेल्या पांढऱ्या तिळाचा वापर करू शकता. गरम दुधात घालूनही आपण तीळाचे सेवन करु शकता.
अननस
अननसामध्ये मॅंगेनीज असते, जे ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत करते. शरीरात मॅंगेनीज नैसर्गिकरित्या उपलबध नसल्यामुळे सांधेदुखी होऊ शकते आणि हाडे कमकुवत होऊ शकतात. म्हणून जेवणापूर्वी एक छोटी वाटी अननसाचा रस घ्या. आपण दररोज एक कप अननसाचा रस देखील पिऊ शकता. त्यामुळेही हाडे मजबूत होतात.
फिश ऑइल
आपण मांसाहारी असल्यास फिश ऑईलचे सेवन करू शकता. फिश ऑईलमधील ओमेगा-3 फॅटी ऍसिडमुळे हाडे आणि स्नायूंचे नुकसान कमी होते. तथापि फिश ऑईलचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे शरीरासाठीही हानिकारक ठरू शकते. म्हणून, हे मध्यम प्रमाणात खा.