कॉफी प्यायला सगळ्यांनाच आवडत. कॉफी पिल्यावर शरिरातील आऴस, सुस्ती निघून जाते. बरेचजण मूड फ्रेश करण्यासाठीही कॉफी आवर्जून पितात. कॉफी पिल्याने मधूमेहाचा धोका कमी संभवतो, असे अनेक फायदे कॉफीचे आहेत. मात्र, कॉफी जास्त प्रमाणात पिल्याने शरिराचे नुकसानही होते. त्यामुळे कॉफी जरा प्रमाणात पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. चला तर मग जाणून घेऊयात कॉफीचे फायदे…
कॉफीचे फायदे खालीलप्रमाणे –
1. कॉफी पिल्याने मांसपेशियांमध्ये होणारा त्रास कमी होतो.
2. कॉफीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने अस्थमा आणि मधूमेहाचा धोका कमी राहतो.
3. कॉफीमध्ये पॉलीहेनोल्स हे रसायन उपलब्ध असते. शरिरात कॅन्सरचे सेल्स कमी करण्यास हे रसायन मदत करते.
4. कामातील ताण कमी करण्यासाठी कॉफी जरूर प्यावी.
5. कॉफी पिल्याने हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत मिळते.
कॉफीचे जरी अनेक फायदे असले, तरी कॉफी अतिप्रमाणात पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक देखील ठरू शकते त्यामुळे कॉफी जरूर प्या मात्र, प्रमाणात प्या.