कर्करोग
थायरॉईड ग्रंथीमध्ये कॅन्सरही होऊ शकतो. शरीराच्या कोणत्याही भागात पेशी असंतुलितपद्धतीने, अनैसर्गिकपद्धतीने वाढणे म्हणजे कॅन्सर. त्यामुळे तो थायरॉईलाही होऊ शकतो.
लक्षणे
थायरॉईडचा कॅन्सर होण्याची काही कारणे सांगता येतात. ती पुढीलप्रमाणे
– थायरॉईड ग्रंथीमध्ये वाढ झाल्याने – थायरॉईड ग्रंथी योग्य प्रमाणात राहणे महत्त्वाचे असते. पण, त्यांचे प्रमाण वाढल्यास कॅन्सर होण्याची शक्यता असू शकते.
– रेडीओथेरपीमुळे -कर्करोग होण्यास रेडीओथेरपीही कारण असू शकते.
– अनुवांशिकता – आपल्याकडे अनेक आजारांचे कारण अनुवांशिकतेमध्ये सापडते. कर्करोगामध्ये आई, आजी, मावशी आदींकडून अनुवांशिकता मिळू शकते. त्याचप्रमाणे ती थायरॉईडच्या कर्करोगातही मिळू शकते.
– आयोडीनची पातळी कमी झाल्यास – थॉयरॉईडच्या एकंदर कार्यातच आयोडीन योग्य प्रमाणात मिळणे गरजेचे असते. ते कमी झाल्यास आजार उद्भवू शकतात. त्यातील एक कर्करोगही असू शकतो.
निदान…
कर्करोगाचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. त्यावरून कर्करोग आहे की नाही, हे कळू शकते. या चाचण्या पुढीलप्रमाणे.
-थायरॉईड ग्रंथीचे अल्ट्रासाऊंड
-बायोप्सी
-थायरॉईड स्कॅन
-रक्ताच्या तपासण्या
उपचार…
– शस्त्रक्रिया – थायरॉईडच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर, त्याची शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे अनियंत्रित वाढलेल्या पेशी काढून टाकता येतात.
– रेडीओ ऍक्टीव्ह आयोडीन – आयोडीनच्या कमतरतेमुळे कर्करोग झाल्याचे निदान झाल्यास, शरीराला आयोडीनचा पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी हा उपचार वापरतात.
– रेडीओ थेरपी – कर्करोगात रेडीओ थेरपीचाही ( radiotherapy for cancer ) उपयोग केला जातो.