Monday, July 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हृदयाशी संबंधित हे लहान-मोठे आजार पडतील इतके महागात कि…

by प्रभात वृत्तसेवा
April 23, 2021
in फिटनेस
A A
हृदयाशी संबंधित हे लहान-मोठे आजार पडतील इतके महागात कि…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – छातीत दुखतं ही कल्पनाही घाबरून सोडते. छातीचं दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असं जणू समीकरणच बनत आहे. मग सुरू होतो विविध तपासण्यांचा भडीमार. अँजिओग्राफी (Angiography) , अँजिओप्लॅस्टी (Angioplasty) आणि वेळ आली तर बायपास सर्जरीही. या उपचार पद्धतींबरोबर त्यांचे वाढते अवाढव्य खर्च या विचाराने रुग्ण नि त्याच्या संबंधित व्यक्तींचं आयुष्य विस्कळीत होतं.

आजकाल 25 ते 30 वर्ष वय असलेल्या हृदयरुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. 2002 मध्ये जागतिक आरोग्यसंघटनेचा हृदयविकार (Heart disease) शी संबंधित अहवाल जाहीर झाला. त्या अहवावालात असं म्हटलं होतं की, जगातील 12.5 टक्के मृत्यू हे हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्याने होतात. अमेरिकेतील पाचांतील एक मृत्यू हा हृदयघाताने होत आहे. भारतात 2007 साली 32 टक्के मृत्यू हे हृदयविकारा (Heart disease) मुळे झाले होते. तर यंदा त्याचे प्रमाण 40 टक्क्‌यांपेक्षाही जास्त आहे.

एकंदरीत हृदयरोगामुळे मृत्यूचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत असल्याचं सातत्याने होणा-या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. दरवर्षी जगातील पावणेदोन कोटी नागरिक हृदयाच्या आजाराने दगावतात. एड्‌स, टीबी, मलेरिया, मधुमेह, सर्व प्रकारचे कर्करोग आणि श्वासरोगामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कैकपटीने जास्त आहे. काही दशकांपूर्वी तरुणाला आलेला हृदयविकारा (Heart disease) चा झटका आश्चर्य व्यक्त करायला लावणारा होता. मात्र, आता चित्र बदललं आहे. देशातील एकूण हृदयरुग्णांपैकी 33 टक्के रुग्ण हे 45 पेक्षा कमी वयाचे आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. यात तरुणांची संख्याही वाढत आहे.

काय आहेत कारणं?
सामान्य जीवनासाठी धोकादायक ठरत असलेल्या हृदयविकार (Heart disease) ची कारणं अनेक आहेत. विद्यार्थ्यांमधील पहिलं कारण आहे, तरुण पिढीवर चारही बाजूने येणारं दडपण. त्यात भर पडते लहानपणापासूनच असणारं पुस्तकांचं ओझं, महाविद्यालयातील प्रवेश, परीक्षेचा ताण यांची. त्यानंतर करिअरविषयी वाढणा-या चिंता, ध्येयपूर्तीसाठीचा दबाव, पुढे जाण्याच्या स्पर्धेत मागे पडण्याची चिंता. हृदयविकारा(Heart disease) चे झटके येण्याच्या अनेक घटनांत हीच महत्त्वाची कारणं आढळून आली आहेत. धमन्यांमध्ये येणा-या अडथळयांमुळेही हृदयविकार (Heart disease) वाढतो. मात्र ही बाब अचानक होत नाही.

तर धमन्यांमध्ये अडथळ्याची प्रक्रिया लहानपणापासूनच सुरू होते. वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया अधिक वाढू लागते. आनुवंशिकतेमुळेही भारतीयांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे. कारण भारतीयांमध्ये लो डेफिनेशन लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. तरीही संतुलीत जेवण, योग्य जीवनशैलीचं पालन यांनी एलडीएलच्या प्रमाणाला नियंत्रित करता येऊ शकतं.

हृदयाशी संबंधित आजार कोणते?
प्रमुख आजार आहे हृदयविकार. या संज्ञेत हृदयाच्या अनेक प्रकारच्या दुखण्यांचा समावेश होतो.
ऍनजायना पेक्‍टोरिस शिलीीेंळी – हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत, पाठीत, मानेत, हातात किंवा यापैकी एखाद्या ठिकाणी वेदना होणं),
आर्टिरिओ स्क्‍लेरॉसिस अीशींशीळे – शुध्द रक्तवाहिन्यांची/धमन्यांची लवचिकता कमी जाऊन त्या कडक होत जाणं),
कार्डिऍक अरेस्ट उरीवळरल  – हृदयक्रिया बंद पडणं
कॉरोनरी हार्ट डिसाज्‌ वळीशरीश – हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येणं किंव्या त्या चिंचोळ्या होणं
व्हॉल्व्यूलर हार्ट डिसीज्‌ तर वळीशरीश – हृदयातील झडपेचा आजार) ही दुखणी हृदयविकार किंवा हृद्रोगात येतात.

हृदय बंद पडतं किंवा त्याच्या कार्यात बिघाड होतो, म्हणजे काय होतं?
हृदयाचे स्नायू खराब होणं, बिघडणं. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्या बंद होतात. त्यामुळे हृदयाकडे होणारी रक्ताभिसरणाची क्रिया थांबते. हृदयाचा रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते. जर हे रक्ताभिसरण सहा तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्या भागात असणारे स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात.

याला हृदयक्रिया बंद पडणं (हार्ट अटॅक) असं म्हणतात. हृदयाच्या स्नायूंमध्ये असणारी रक्ताची गुठळी होणं किंवा रक्तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद होणं असंही म्हणतात. रक्तवाहिनीचं तोंड बंद झाल्याचा परिणाम हृदयाच्या थोडय़ा भागांवर झाला असेल छोटय़ा प्रमाणातील हार्ट अटॅक येतो. आणि जास्त भागावर परिणाम झाला असेल तर त्याला मोठय़ा प्रमाणातील हार्ट अटॅक किंवा हृदयाचा तीव्र झटका असं म्हणतात.

या आजारावर प्रथमोपचार आहेत का?
आहेत ना. पण हे उपचार रुग्णावर झटकन झाले पाहिजेत. आणि ते झाले तर रुग्णाचे जीव वाचतात. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवं झोपवावं. त्याचे सर्व घट्ट कपडे सल करावेत. जर ऑक्‍सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑक्‍सिजन द्यावा. नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरब्रिटेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात ऍस्प्रीन ढवळून द्यावं.

डॉक्‍टरांकडून केले जाणारे उपचार कोणते?
हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार आणि इस्पितळात भरती करणं गरजेचं असतं. हृदयाचा त्रास निर्माण झाल्याची काही मिनिटं, काही तास जरा संकटाचे असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधं दिली जातात. डॉक्‍टर रुग्णांची सूक्ष्म तपासणी करतात. हृदयाची स्पंदनं मोजतात. रक्तदाब पाहतात. इलेक्‍ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो.

ईसीजीमुळे हृदयाच्या ठोक्‍यांचा अंदाज येतो. या ठोक्‍यांमध्ये काही असामान्य लय आहे का ते दिसते. हृदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास तेही लक्षात येतं. मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येतं. छातीचा एक्‍सरेदेखील घेतला जातो. हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे. हृदयाच्या कार्याची माहिती मिळते. कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अँजिओग्राम काढला जातो.

तपासण्यात हृदयाची स्पंदनं असामान्य आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधं दिली जातात. रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधं दिली जातात. प्रत्येक रुग्णाची आणि त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचं नुकसान आणि अडथळ्यांचं प्रमाण, रुग्णाचं वय लक्षात घेऊन उपचारपद्धती ठरवली जाते. कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्‍यक असते. रक्त पातळ करण्याची इंजेक्‍शनही दिली जातात. कोरोनरी अँजियोप्लास्टी, फुग्याने रक्त वाहिन्यांचा अडथळा दूर करणं किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.

डॉ. राजेश पाटील

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedablack pepperblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagartopnewsआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar