या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव मिथिल नॅप्थोक्विनोन आहे. रक्तस्राव-प्रतिरोधी म्हणून आवश्यक असणाऱ्या मेदविद्राव्य (मेदात विरघळणाऱ्या) मिथिल नॅप्थोक्विनोन अनुजात (एका संयुगापासून तयार केलेल्या दुसऱ्या संयुगांच्या) समूहाला के जीवनसत्त्व असे नाव देण्यात आले आहे. ( vitamin c benefits )
काय करते ?
उच्च प्राण्यांमध्ये रक्तरसातील (रक्त गोठल्यानंतर उरलेल्या पेशीरहित निवळ द्रवातील) प्रोथ्रॉंबीन, प्रोकन्व्हर्टीन आणि आणखी काही घटकांच्या अपुऱ्या जैव संश्लेषणामुळे (शरीरात तयार न होण्यामुळे) रक्तस्राव होण्याची प्रवृत्ती वाढते. अशा तऱ्हेचा रक्तस्राव होऊ न देण्याचे कार्य हे जीवनसत्त्व करते.
रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी प्रोथॉंबिन या प्रथिनाची गरज असून ते यकृतात तयार होते. यकृतात प्रोथ्रॉंबिन तयार होत असताना के जीवनसत्त्व विकाराचे काम करते. प्रोथ्रॉंबिन हा थ्रॉंबिन थ्रॉंबिन या प्रथिनाचा पूर्वगामी आहे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठायला वेळ लागतो. अतिरक्तस्त्राव टाळण्याचे कार्य के जीवनसत्त्व करते. अतिरक्तस्त्रावाची शक्यता असल्यास गर्भवती मातांना प्रसूतीआधी आणि नुकत्याच जन्मलेल्या बालकांना के जीवनसत्त्व देतात.
कशात असते? ( vitamin c benefits )
– हिरव्या भाज्या, कोबी,
– फुलकोबी (फुलवर),
– टोमॅटो,
-तृणधान्ये,
– कोंडा,
– पालक,
– सोयाबीन,
-नारिंगाच्या साली,
– अंड्याचा पिवळा बलक यांमध्ये हे जीवनसत्त्व असते.
-प्राण्याच्या ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) हे जीवनसत्त्व असते. मात्र यकृत व फुप्फुस यांमध्ये त्याचे प्रमाण अत्यल्प असते.
दैनंदिन किती गरज? ( vitamin c benefits )
या जीवनसत्त्वाची दैनंदिन गरज नक्की ठरविणे कठिण आहे. कारण आंत्रातील (आतड्यातील) सूक्ष्मजंतू संश्लेषणाने त्याचे उत्पादन करतात.