Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘हे’ आहेत काळी मिरीचे निरोगी फायदे

by प्रभात वृत्तसेवा
April 22, 2021
in आयुर्वेद, आहार
A A
‘हे’ आहेत काळी मिरीचे निरोगी फायदे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पायपर लॉंगम
कुल : पायपेरेसाई

भारतीय नावे :
हिंदी – पिपला, पिपली
आसामी – पिपलू
बंगाली – जात्या, पिपल
गुजराथी – पिपली
संस्कृत, मागधी – पिप्पली
तामिळ, तेलुगू – पिपिली

लॉंग पेपर हे व्यावहारिक नाव झाडाच्या इंग्रजीतल्या सर्वसाधारण नावावर आधारित आहे. याचे कणीस लांब असते यामुळेच याला लॉंग पायपर म्हणतात. यावरुनच हे पायपर नीग्रम या दुसऱ्या जातीपासून ओळखले जाते. पायपर नीग्रमची फळे गोल असतात.

काही जुन्या लिखाणात लॉंग पायपर “मगधी’ नावाने संबोधिलेले आहे. यावरून हे झाड मगध भागातील म्हणजे उत्तर बिहारमधील आहे असे दिसते. हे झाड भारतात उष्ण भागात उगवते आणि मुद्दाम लावलेही जाते. सुगंधित असते, जमिनीवर रांगणारे लहान झाड, बऱ्याचदा वल्लरीसारखे दिसते; खालची पाने 6-10 सें.मी. लांब, रुंदपणे अंडाकृती, आरंभस्थानी खोलपणे हृदयाकृती व पाळी मोठी; वरची पाने लांबट अंडाकृती, वरच्या पृष्ठभागावर पूर्ण गर्द हिरवे आणि चमकदार, खालच्या पृष्ठभागावर फिकट, अनुपर्णे ठळक, 1.3 से.मी. लांब, परंतु लगेच गळून पडणारी, फुलांचे कणीस एकेक, पुंपुष्पाच्या कणिसाचे सहपत्र अरुंद, स्त्रीपुष्पाचे गोल, फळ लहान, अंडाकृती, मांसल कणीसात बुडालेले, 2.5 – 4 सें.मी. अंडाकृती-लांबट, काळपट हिरवे, चमकदार.

उपयुक्तता : लॉंग पेपर म्हणजेच या झाडाची वाळवलेली फळे औषधी असतात. ती शक्तीवर्धक म्हणून व उत्तेजक तपकिर तयार करण्यासाठी वापरली जातात. संधिवाताच्या दुखण्यावर आणि अर्धांगवायूवर चोळण्यासाठीच्या औषधात वापरली जातात. श्वासनलिका सुजण्याच्या जुन्या रोगात या झाडाच्या कच्च्या, वाळवलेल्या फळांचा काढा देण्यात येतो. याची पक्वी फळे पचनास मदत करणारी, वातबद्धतेचा त्रास दूर करणारी व सुगंधी आहेत. पानांचा आणि फळांचा जीवाणूनाशक गुणधर्म सप्रयोग सिद्ध करण्यात आला आहे.

इतर जाती: अशा पायपर नीग्रम किंवा ब्लॅक पेपर (बंगाली, हिंदी – गोल मिरच, काली मिरच, दखनी मिरच; संस्कृत – कफविरोधी, मराठी – काळे मिरे, मिरे) ही पायपर या प्रजातीची दुसरी जात आहे.

बहुतेक भाषांमधील नावामध्ये फळांच्या आकारावरून “गोल’ आणि रंगावरून “काली’ असा उल्लेख येतो. संस्कृत नावावरून या फळांच्या वापराविषयीचा बोध होतो. पायपर क्‍युबेब (शीतल चिनी, सुगंध मरिच, कबाब चिनी) हे आग्नेय आशियातील झाड आहे. त्याच्या फळांपासून काढलेले तेल मूत्रउत्सर्जन संस्थेच्या रोगावर उपयोगी आहे.

काळे मिरे ही एक मजबूत मोठी, काष्ठमय खोड, फांद्या व रुंद अंडाकृती गोल पाने असलेली वल्लरी आहे; फुले लांब कणिसात येतात; फळे लहान गोलाकार 6-7 मि.मी. परिघाची, पिवळी पक्व झाल्यावर लाल होणारी. काळे पेपर म्हणजे काळे मिरे हे औषध वाळवलेल्या कच्च्या फळांपासून मिळते. ते उत्तेजक, कोष्ठवायू कमी करणारे व पचनास मदत करणारे आहे.

ते जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरातील उष्णता वाढते व घाम येतो. हे मूत्रवर्धक व मूत्रविरेचक असते पण यामुळे मूत्राशयात जळजळ होते. बियांवर केलेल्या काही प्रयोगांनी त्यांच्यात जीवाणूनाशक गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे.

स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंत काळ्या मिऱ्यांचा मसाला वापरण्यात येतो. हा मसाला वातकोष्ठतेत फायदा देणारा म्हणून वापरण्यात येतो. त्याचा स्वाद तिखट असल्याने गुजरातीत या मिऱ्यांना “तिरवा’ असेही म्हणतात. मिरे मुख्यत: दक्षिण भारतात कर्नाटक व केरळ मधील जंगलात होतात.

तेथील मळ्यात सुपारीच्या वृक्षांवर मिऱ्याचे वेल चढवून मिऱ्याचे उत्पन्न काढले जाते. मद्रास व तामिळनाडूमध्येही मिऱ्याची पैदास होते. मिऱ्याच्या वेलांना चांगले वाढू दिले, तर हे वेल वीस ते तीस फूट उंच वाढतात; परंतु मिऱ्याचे उत्पन्न अधिक येण्यासाठी वेल वारंवार वरून कापण्यात येत असते.

नागवेलीच्या पानांप्रमाणे मिऱ्याची लागवड केली जाते, त्याची पाने नागवेलीच्या पानांसारखीच असतात. मिऱ्याच्या वेलाला फळांच्या मंजिऱ्या येतात. या मंजिऱ्यांनाच मिरे म्हणतात. मिऱ्याचे वेल अनेक वर्षे टिकून राहतात. कलम केल्यानंतरही वेल चांगली होते.

मलबार येथे हिरव्या मिऱ्यांचे लोणचे बनविले जाते. हिरव्या मिऱ्यांच्या मंजिऱ्या समुद्राच्या पाण्यात घालून पिंपात भरून बाहेर गावी पाठवल्या जातात. मिऱ्याच्या वेलाला ज्या शेंगा लागतात, त्यांना “गजपीपळ’ असे म्हणतात व मिऱ्याच्या मुळांना “चक्‍क’ असे म्हणतात. मिरच्यांपेक्षा मिरे कमी दाहक व अधिक गुणकारी असतात.

यास्तव मिरच्यांपेक्षा मिरे वापरणे अधिक हितावह असते. उत्तर भारतातील लोक व इंग्रज लोक मिरच्यांऐवजी मिऱ्यांचा वापर जास्त प्रमाणात करतात. मिऱ्याचा योग्य वापर केल्यास मिऱ्यातून रसायनयुक्त गुण प्राप्त होतात. यास्तव आयुर्वेदामध्ये मिऱ्यांना “युक्त चैव रसायनम्‌’ असे म्हटले आहे.

काळे आणि पांढरे असे मिऱ्यांचे दोन प्रकार आहेत. अर्धवट पिकलेले मिरे वाळवले की ते काळ्या रंगाचे होतात. हे काळेभोर मिरे बाजारात विकले जातात. मिरे पिकल्यानंतर त्याची टरफले आपोआप निघून जातात व पांढरे बनतात त्या मिऱ्यांना सफेद (पांढरे) मिरे म्हणतात.

मिरे पूर्ण पिकल्यानंतर त्यांचा तिखटपणा कमी होतो व त्यांना एक चांगला स्वाद येतो. पांढरे मिरे उष्णही असत नाहीत व थंडही असत नाहीत; परंतु ते शीतवर्य असतात. मिऱ्यांमध्ये पांढरे मिरे गुणांनी श्रेष्ठ असतात. पांढरे मिरे मस्तकासाठी पोषक व चक्षुष्य समजले जातात. पांढरे मिरे ष्टीचा कमजोरपणा दूर करतात. पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थात व पापडामध्ये पांढरे मिरे वापरले जातात. तसेच नेत्ररोगांत अंजन म्हणूनही त्यांचा उपयोग केला जातो.

– सुजाता गानू

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgirasea foodskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar