बाजारात आस्कंद किंवा अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) या पांढऱ्या, बोटभर लांबीच्या साधारण लहान मुलांच्या करंगळी एवढ्या जाडीच्या पांढऱ्या कांड्या मिळतात त्यास आस्कंद किं वा अश्वगंधा म्हणतात. त्याच्या ताज्या मुळ्यांना घोड्याच्या मुत्राप्रमाणे वाईट दुर्गंधी येते. म्हणून त्याला अश्वगंधा असे नाव पडले.प्राचीन काळापासून स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी अश्वगंधा वापरली जाते.
तशी या वनस्पतीची मुळे, बिया, पाने, फळे सर्वच घटक उपयुक्त आहेत. लघवी साफ होण्यासाठी अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) उपयुक्त आहे. मानसिक तणाव कमी व्हावा, शिवाय जोम, उत्साह आणि शक्ती वाढीस लागावी यासाठी अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) वनस्पतींपासून आयुर्वेदाने अनेक उपयुक्त औषधे तयार केली आहेत. पुरुषांचा जोम वाढविण्यासाठी अश्वगंधा( Ashwagandha Benefits In Marathi) उपयुक्त आहे. चीनमध्ये या अश्वगंधाला महत्त्व आहे.
अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) च्या मुळांमध्ये “अल्कोलाईड’ वर्गीय रसायनांचा भरणा असल्यामुळे ती बरीच गुणकारी झाली आहे. मराठीत आणि पंजाबीमध्ये अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) ला आस्कंद किंवा अस्गंद म्हणतात. गुजरातीमध्ये घोडा किंवा घोडाकुत्र, तर तेलगुमध्ये पुलिवेंद्रम, तमिळमध्ये आचुवंधी तर कानडीमध्ये विरेमद्द (लिनागट्ट) अशी नावे अश्वगंधाला दिली गेली आहेत. अश्व म्हणजे घोडा आणि गंध म्हणजे वास. तेव्हा या वनस्पतींचा घोड्याशी काय संबंध असा प्रश्न आपल्या मनात आला असेल.
या वनस्पतीच्या मुळाशी कधी कधी बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि त्यावेळी त्याला घोड्याच्या मूत्राचा वास येतो! एकूण या वनस्पतीचा वास काहीसा उग्र आहे पण तिची गुणवत्ता मात्र औषधीदृष्ट्या बहुमोलाची आहे. अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) चा अर्क काढून भुकटी बनवली जाते. जी अतिशय औषधी आहे. हिमालयातील पर्वतराजींमधील अश्वगंधा अधिक गुणकारी असते.
या वनस्पतीचा अर्थ्रायटिस व विशिष्ट प्रकारच्या संधिवाताच्या उपशमनासाठी उपयोग होतो.तसेच काही अस्थिरोगाच्या प्रकारांवरती अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) पासून बनवलेली औषधे (भुकटी) गुणकारी आहे. मिश्रणाची गोळी, कॅप्सूल, द्रवरूप कॅपलेट बनवता येते. एका कंपनीने अश्वगंधाचा वापर करून चक्क मिल्क चॉकलेटसुद्धा तयार केलंय.
भारतातील पेटंट ऑफिसमध्ये अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) शी संबंधीत असलेली पेटंट्स दाखल झालेली आहेत. अश्वगंधा वनस्पती अधिक सुरक्षित आणि गुणकारी आहे. जिनसेंगला पर्याय म्हणून अश्वगंधाचा वापर होऊ शकतो. त्याची लागवड करून धनसंपदेची प्राप्ती होऊ शकते. पण त्या संबंधीचे पेटंटही घेणे उपयुक्त ठरेल. या वनस्पतीमध्ये त्वचा रक्षणाचे गुण असल्याने सौंदर्य प्रसाधनात त्याचा वापर होतो.
जपानी संशोधकांनी त्यांच्या पेटंटच्या मजकुरामध्ये ही वनस्पती भारत आणि भूमध्य समुद्राजवळील देशांजवळ आढळते. असे नमुद केले आहे. एक पेटंट हे एका मिश्रणाचे म्हणजे फॉर्म्युलेशनचे आहे. एन्डोक्राईन या हॉर्मोनचे संतुलन नीट होण्यासाठी अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) तील रसायने मदत करतात. हे मिश्रण जोम-उत्साह टिकवणारे असून वीर्यवर्धक आहे. मिश्रणांच्या एकूण 12 पेटंटमध्ये अश्वगंधा केवळ एक घटक म्हणून आहे.
पेटंटमध्ये “क्लेम्स’ हा भाग फारच महत्त्वाचा असतो. त्या “क्लेम्स’मध्ये अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) चा उल्लेख नाही; मात्र, पेटंटच्या उर्वरित मसुद्यात आहे. अशी सात पेटंटस् अमेरिकेच्या पेटंट ऑफिसने (यूएसपीटीओने) मंजूर केलेली आहेत. अशाप्रकारे अश्वगंधा ही वीर्यवर्धक, शक्तीवर्यक, सौंदर्यवर्धक आणि अनेक व्याधींवर उपयुक्त असल्याचे भारतीय आयुर्वेदाने फार प्राचीन काळीच मान्य केले आहे.
सांधेदुखीवर – या दुखण्यावर हे रामबाण औषध आहे. आस्कंदाचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण 3 ग्रॅम सांज-सकाळ, तूप 3 ग्रॅम व साखर 1 ग्रॅम घालून घेतले असता सांधे दुखी दूर पळते.
वीर्यवृद्धीकरणारा – आस्कंद वीर्यवृद्धी करणारे आहे. आस्कंदाचे 3 ग्रॅम चूर्ण, पाव लिटर गाईचे दूध व 10 ग्रॅम खडीसाखर याबरोबर घ्यावे, शक्ती वाढते.
क्षयावर – क्षयरोगी व्यक्तींचे वजन कमी होत जाते.आस्कंद क्षयावर फार गुणकारी आहे. आस्कंद चूर्ण दूधातून घेताना त्यात चवीपुरती खडीसाखर घालावी.
कोरडा खोकला झाला असता – कोरडा खोकला झाला असता आस्कंदाच्या काढ्याने फायदा होतो. 25 ग्रॅम आस्कंदाच्या काड्यांचा 1/2 लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. त्यात 3 ग्रॅम आस्कंदाचेच चूर्ण घालून तो सकाळ संध्याकाळ दोनदा घ्यावा. याने आठवड्यात गुण वाटू लागतो.
निद्रा नाशावर – हल्लीच्या ताणतणावाच्या आयुष्यात निद्रा नाशाचा विकार हा बहुतेक लोकांना जडतो. स्वस्थ झोपेसाठी अश्वगंध अत्यंत उपयुक्त आहे. आस्कंदाच्या बिया दुधात टाकल्या असता दूध घट्ट होते. आस्कंद चूर्णाने चांगली स्वस्थ झोप येऊन मन प्रसन्न रहाते. याचे इतर औषधांसारखे कोणतेच दुष्परिणाम नाहीत. लघवी साफ होण्यासाठी अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) चूर्ण लघवी साफ होण्यासाठी मधुमेहींनी घ्यायला काही हरकत नाही.
निरोगी हृदयासाठी – अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) ने हृदय सशक्त होते.
वायुहारक – आस्कंद अत्यंत वायुहारक आहे. अंग दुखणे, अंगात चमका मारणे, उठता, बसताना हातपायगुडघेदुखीचा त्रास अश्वगंधा ( Ashwagandha Benefits In Marathi) चूर्ण दुधातून घेतल्याने बरा होतो. आस्कंद हे वायुहारक आहे.
प्रदरावर – स्त्रियांच्या प्रदरावर आस्कंद चूर्ण उपयुक्त आहे. गर्भ रहाण्यासाठी व चांगले दूध येण्यासाठी बायकांना गर्भ राहण्यासाठी व तो योग्य प्रकारे वाढविण्यासाठी व स्त्रियांना दूध चांगले येण्यासाठी आस्कंदचूर्ण देतात. शरीरात कोठेही गाठ आली असता आस्कंदाचा लेप वरून लावतात.
व्रण सूजेवर – तसेच व्रण, उठाणू, दुष्टव्रण व सूज हेही आस्कंदाचा लेप लावला असता बरे होतात. कोणत्याही वेदनेवर अथवा जखमेवर बाहेरून आस्कंदाचा लेप लावला असता जखम बरी होते व वेदनेची तीव्रता कमी होते.
खरूज व नारूवरही – खरूज व नारूवरही आस्कंद शुद्ध खोबरेल तेलातून लावतात. त्याने खरूज व नारू बरे होतात.
रक्त शुद्धीसाठी – चोपचिनी व आस्कंद यांचे समभाग चूर्ण, तूप व मध यातून घेतले असता रक्त शुद्ध होऊन अंगाची कांती वाढते.अशाप्रकारे अश्वगंध ही अत्यंत उपयुक्त वनौषधी आहे.
-सुजाता गानू