Monday, February 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘हे’ आहेत शरीर स्वस्थ ठेवण्याचे खास मूलमंत्र

by प्रभात वृत्तसेवा
March 21, 2021
in आरोग्य वार्ता, फिटनेस, मानसिक आरोग्य, लाईफस्टाईल
A A
‘हे’ आहेत शरीर स्वस्थ ठेवण्याचे खास मूलमंत्र
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – बघितल्याशिवाय पाणी पिऊ नये. जाणल्याशिवाय मित्रता करू नये, हात धुतल्याशिवाय खाऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्यांचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शत्रुता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्‍वास ठेवू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधी आणि विपत्तीपासून बचाव होऊ शकतो.

झोपावयास जाण्याअगोदर लघवी करणे, गोड दूध पिणे, दात घासून चूळ भरणे, हात पाय धुणे, दिवसभर केलेल्या कामावर मनन करून ईश्‍वराचे ध्यान करून झोपणे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हितकर असते.

अतिव्यायाम, अति थट्टा विनोद, अति बोलणे, अति परिश्रम, अति जागरण, अति मैथुन या गोष्टींचा अभ्यास असला तरी अति करणे योग्य नाही, कारण अति करणे आज ना उद्या कष्टकारकच ठरते.

या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रितीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रितीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचेही विष होऊ शकते.

सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे.

मलमूत्र, शिंक, अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायू व श्रमाने झालेला श्‍वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना थांबवू नये.

जेवताना सॅलेड म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, पालक इत्यादी जे काही उपलब्ध असेल ते बारीक सॅलड करून घ्यावे.

हिवाळ्यात सकाळी ऊन घेणे व रात्री थंडीपासून बचाव करणे हितकारी असते; परंतु उपाशी राहणे व उशिरापर्यंत जागणे नुकसानकारक असते.

अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवताना काळजी करणे, जेवताना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी पिल्याने अपचन व अजीर्ण होते.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsAcneadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietDomestic Therapyfitnesshealthhelth tipsjaswantlife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआयुर्वेदआरोग्य वार्तापाठदुखी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar