Thursday, May 22, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हे आहेत किडनी विकाराची प्रमुख करणे; किडनी तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे नक्की वाचा

by प्रभात वृत्तसेवा
December 5, 2020
in आरोग्य वार्ता, आहार
A A
हे आहेत किडनी विकाराची प्रमुख करणे; किडनी तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे नक्की वाचा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

देशातील बहुसंख्य लोक हे डायबेटिस आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच किडनी विकारांचा धोका वाढला आहे. इतर अनेक रोगांप्रमाणे आणि त्यांच्या लक्षणांप्रमाणे किडनी विकार हा अचानक आपलं रूप दाखवत नाही. म्हणून किडनी वाचवायची असेल तर हा लेख वाचणं तुमच्यासाठी महत्त्वाचंच आहे.

या वाईट सवयी सोडा
1. मद्यपानाला रामराम करा.
2. धूम्रपानामुळेही तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो
3. चरबीयुक्त आहार घेणे टाळा.
4. शरीराचे वजन कमी ठेवल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबही नियमित राहू शकेल.
5. उच्च तणावाच्या जीवनशैलीत राहणे टाळा. त्यामुळे हायपरटेन्शनचा विकार जडू शकतो.

या विकाराविषयी किमान जनजागृती आणि माहितीद्वारे किडनी विकार दूर ठेवता येतात आणि तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. आरोग्य उत्तम राखणे ही एक कला आहे. उत्तम आरोग्य हे आपल्याला सहजासहजी मिळत नसतं, तर देवाने दिलेल्या आपल्याला या शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी प्रयत्नांची आवश्‍यकता असते.

जीवनशैलीतील सततचे बदल हे सध्या डायबेटिस, हायपरटेन्शन, कोलेस्टेरॉल, थायरॉइड आदी आजारांना निमंत्रण ठरू लागले आहेत. फास्ट फुडचा अतिरेक आणि बैठे काम करण्याची सवय, त्याचवेळी व्यायामाचा कंटाळा किंवा त्यासाठी वेगळा वेळ न देणे हे डायबेटिस, हायपरटेन्शन, जठरासंबंधीचे विकार आणि स्थूलपणा या आजारांना निमंत्रण ठरते आहे. हे आजार लहान मुले आणि तरुणांमध्ये वाढू लागले असून, या आजारांमुळे किडनी आणि त्यासंबंधीचे विकार बळावू लागले आहेत.

भारतीयांना किडनी विकारांचा धोका सर्वाधिक असल्याचं निदर्शनास आलं आहे. देशातील बहुसंख्य लोक हे डायबेटिस आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच हा किडनी विकारांचा धोका वाढला आहे. इतर अनेक रोगांप्रमाणे आणि त्यांच्या लक्षणांप्रमाणे किडनी विकार हा अचानक आपलं रूप दाखवत नाही. आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळेच हा विकार उद्‌भवतो.

याची प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे –
1. सर्वाधिक सोडियमचे प्रमाण असलेले अन्नपदार्थ खाणे.
2. सोडायुक्त शीतपेये पिणे.
3. जेवणाच्या विचित्र वेळा विशेषकरून रात्री उशिरा उच्च कारबोहायड्रेट असलेला आहार घेणे.
4. जेवल्या जेवल्या झोपायला जाणे अयोग्य आहे.

किडनी विकाराने ग्रस्त असलेले देशभरातील 60 टक्के रुग्ण हे एकतर डायबेटिस किंवा उच्च रक्तदाब या विकारांनी पछाडलेले असतात. त्यातही मधुमेह हे किडनी निकामी होण्याचं प्रमुख कारण आहे. यामुळे किडनीजवळील तुमच्या मोठया रक्तवाहिन्या आणि लहान रक्तवाहिन्या निकामी होतात. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, स्थूलपणा, प्रतिकारशक्ती कमी असणे, मूत्रपिडातील संसर्ग, मूत्रपिडाचे काही कौटुंबिक आजारही किडनी विकारांना कारणीभूत ठरतात.

या सर्वाचा परिणाम किडनीवर होतो. रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले न गेल्याने त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि शरीरात टाकावू द्रव्यपदार्थाचं प्रमाण साठत जातं. त्यामुळे मग डायलिसिस करण्याची वेळ येते किंवा किडनी रोपण करण्याची वेळ येते. तीव्र मूत्रपिडाचा विकार (सीकेडी) हा कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. पण, हा विकार प्रामुख्याने 40 ते 50 वयोगटांतील व्यक्तींमध्ये दिसून येतो. देशातील 10 टक्क्‌यांहून अधिक लोकांना तीव्र मूत्रपिडाचा विकार असून, हे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे.

दरवर्षी भारतात सुमारे तीन ते चार लाख लोकांना किडनीरोपणाची आवश्‍यकता आहे, मात्र त्यातील एक टक्काच रुग्णांना किडनी रोपणासाठी दाते अर्थात डोनर्स उपलब्ध होतात व त्या शस्त्रक्रिया यशस्वी होतात. जनजागृतीचा अभाव, डायबेटिस आणि तीव्र मूत्रपिंडाचा विकार यामुळे हे अपयश पदरी पडते. आहारामध्ये काही आवश्‍यक बदल आणि काही आरोग्यदायी सवयी यांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणू शकता. विविध प्रकारचे आवश्‍यक बदल हे प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरतात. मग त्यांना मूत्रपिडाचा विकार असो वा नसो. आणि ते केवळ त्या व्यक्तीलाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यदायी जीवनशैलीलाही उपयुक्त ठरतात!

पुढील पथ्ये पाळतील तर तुम्ही तुमची किडनी तंदुरुस्त ठेवू शकता :
1. तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी आवाक्‍यात ठेवा.
2. तुमचा रक्तदाब नियमित ठेवा. तुम्ही जर रक्तदाबासाठी काही औषधे घेत असाल, तर ती तुमच्या डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याने घ्या.
3. सकस आहार घ्या आणि तुमच्या आहारतज्ज्ञाने ठरवून दिलेल्या आहाराप्रमाणे घ्या.
4. वर्षातून किमान एकदा तरी किडनीसंदर्भातील चाचण्या करून घ्याव्यात.
5. वारंवार पेनकिलर्स घेणे टाळावे. आर्थरायटीस रोगामध्ये नॉन स्टेरॉइड दाहकविरोधी औषधांचे दररोज सेवन केल्यामुळे तुमची किडनी निकामी होऊ शकते.
6. तुम्ही जर आर्थरायटीजसारख्या आजाराने ग्रस्त असाल आणि अशा प्रकारची औषधं तुम्हाला घ्यावी लागत असतील, तर यासंदर्भात तुम्ही तुमच्या डॉक्‍टरांशी चर्चा करा आणि किडनीला कोणतीही हानी पोहोचणार नाही अशा तऱ्हेने तुमच्या आजारावर तोडगा काढा.
7. मूत्राशय किंवा किडनी विकारांसाठी योग्य डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.

Tags: blooddiabeteshealthHypertensionkidney
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar