पुढील आठवड्यात श्रावण महिना सुरु होईल. त्यामुळे अनेक घरांत सध्या “गटरी”ची तयारी सुरु असेल. तांबडा, पांढरा रस्सा, चिकन सूप, चिकन लॉलीपॉप, चिकन बिर्याणी, तंदूर, असे वेगवेगळे प्रकार करण्यात येतात. चिकनमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं.
1. प्रोटीन बरोबर चिकन मधून फॉस्फरस, कॅल्शिअम हे तत्व मिळतात. यामुळे हाडं बळकट होतात.
2. चिकनमध्ये सेलेनियम असतं. जे सांधे दुखीचा त्रास कमी करते.
3. चिकनमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचा गुण आहे. त्यातील नियासिन हा घटक कोलेस्ट्रॉल कमी करतो.
4. चिकनमध्ये कोलेस्ट्रॉल कमी असतं. हे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आजार कमी करते. त्यामुळे मटण खाण्याऐवजी चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो.
5. चिकनचे गरम गरम सूप प्यायल्याने सर्दी, कफ कमी मदत होते.
6. चिकनमध्ये मॅग्नेशियम असतं. जे महिलांमध्ये पीरिअड्स चालू होण्याआधी तणाव कमी होतो.
7. चिकनमधून व्हिटॅमिन बी 5 मिळते जे थकवा दूर होतो.
8. शंभर ग्रॅम चिकनमध्ये 239कॅलरीज असतात. 100 ग्रॅम मधले 27 ग्रॅम प्रोटीन असतात.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.