रोजच्या जेवणामध्ये टोमॅटोचा वापर करतो. लाल लाल रंगाचे टोमॅटो जेवणाची चवच नाही वाढवत तर त्याचे अनेक फायदे ही आहेत. टोमॅटोचा वापर आपण किचनमध्ये रेसिपी करायला, टोमॅटो केचअप, टोमॅटो सूप, सलड, टोमॅटोची भाजी असे विविध पदार्थ तयार करतो. टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर भरपूर असतात.
1.ज्यांनी रक्ताची कमतरता आहे. त्या रुग्णांनी नियमित रोज दोन टोमॅटो दिवसातून खावेत.
2.टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ‘अ’ भरपूर प्रमाणात असते. डोळ्याच्या विकारावर टोमॅटो फायदेशीर आहे.
3.टोमॅटोमध्ये एँटीऑक्सिडेंट असतात जे आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत करतात.
4.टोमॅटोमध्ये केरोटीन हे तत्व असते. जे शरीरातील वेदना दूर करण्यास मदत करतो.
5.टोमॅटोमध्ये फायबर भरपूर असतात जे वजन कमी करण्यास मदत करते व पोट भरल्यासारखे राहते.
6.वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यास टोमॅटो उपयुक्त आहे.
7.टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ‘के’ असल्यामुळे हाडे मजबूत होतात.
8.त्वचेला चमकदार बनवण्यासाठी टोमॅटो खाणे चांगले.
9.टोमॅटोमध्ये बीटा करोटीन, पोटॅशियम, व्हिटॅमिन ‘सी’, फोलेट, व्हिटॅमिन ‘ई’ हे तत्व असतात. टोमॅटो टाईप-2 डायबिटीसमध्ये फायदेशीर ठरते.
10.टोमॅटोमध्ये फोलिक ऍसिड असते. गरोदर महिलांना व बाळाला टोमॅटो खाणे उपयुक्त आहे.
11.टोमॅटोमध्ये 18 ग्रॅम कॅलरी, 3.8 ग्रॅम कार्ब असतात.
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.