पुणे – तुळशीला आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती, धर्म यापलीकडे देखील तुळस आरोग्यास लाभदायक आहे. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक ऊर्जाच प्राप्त होत नाही, तर बऱ्याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तर आज जाणून घेऊ तुळशीचे विविध आरोग्यदायी फायदे…
१) तुळस सौंदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केस यासाठी देखील लाभदायक ठरते. तुळशीची पाने घरगुती उपायांमध्येही वापरली जातात. त्याचा सुंधगही खूप सुंदर असतो.
२) अल्सर आणि तोंडा संबंधीच्या असलेल्या संसर्गावर तुळशीची पाने लाभदायक ठरतात. दररोज तुळशीची पाने चावून खाल्याने तोंडाचे अनेक आजार दूर होतात.
३) सर्दी झाल्यानंतर अनेक वेळा नाक चोंदणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्याने, सर्दी दूर होऊ शकते.
४) तुळस, अद्रक एकत्र मिश्रण करुन मधासोबत सेवन केल्यास सर्दी आणि ताप या आजारापासून आराम भेटू शकतो. तसेच तुळशीचा मुळांचा काढा तापनाशक आहे. या काढ्यामुळे अनेक लहान-मोठे आजार बरे होण्यास मदत होते.
५) तुळशीच्या पानांमुळे डोळ्यांचे आजार देखील लवकर बरे होतात. तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकात कमी होण्यास मदत होते.