वॉशिंग्टन – जगभरात हाहाकार उडवलेल्या करोनावर आयोडीन रामबाण ठरेल, असा दावा येथिल संशोधकांनी केला आहे. करोनाबाधिताने सातत्याने आयोडीनने नाक व तोंड धुतले तर करोनापासून स्वतःचा बचाव करता येउ शकेल, असेही या संशोधकांनी म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डबल्युएचओ) यापूर्वी असाच केलेला दावा फेटाळला असला तरीही अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसीन या संसंथेतील संशोधक याबाबतीत आशावादी आहेत. केवळ बाधित व्यक्तींनीच नाही तर प्रत्येकाने नाक व तोंड साफ करण्यासाठी आयोडीनचा वापर केला तर करोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी होइल असेही या संशोधकांनी म्हटले आहे.
या संशोधकांनी करोना विषाणूच्या एक नमुन्यावर तीन वेगवेगळ्या चाचण्या केल्या. तसेच बाधितांवर आयोडीन देण्याचा प्रयोग केला तेव्हा हा विषाणू पूर्ण नष्ट होण्यास केवळ 15 सेकंदाचा वेळ लागतो, असे त्यांच्या निदर्शनास आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
करोनाच्या विषाणूला निष्क्रिय करता येत असल्यामुळे या विषाणूचा संसर्ग फुफ्फुसापर्यंत जाण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे हाच उपाय करोनाबाधितांवर केला तर त्याचेही सकारात्मक परिणाम दिसून येतील असेही या दाव्यात नमुद करण्यात आले आहे.