नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या कोरोना लसीसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमटीची कोरोना लसीसंदर्भात बैठक होणार झाली आहे. करोना लसीकरणाची सराव फेरी शनिवारी ( २ जानेवारीला ) आज सर्व राज्यांमध्ये होणार आहे.
राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये तीन ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येईल. महाराष्ट्र आणि केरळमध्ये राजधानींव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही सराव फेरी राबवली जाऊ शकेल. तर दुसरीकडे आदिवासी बांधव खात असलेली लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर रामबाण उपाय ठरणार असल्याचे माहिती समोर आली आहे. ओडिशा आणि छत्तीसगडमधील आदिवासी बांधव नेहमीच सर्दी सारख्या आजारांवर लाल मुंग्यांची चटणी औषध म्हणून खातात यामुळे आता या चटणीला लवकरच आयुष मंत्रालयकडून कोरोना विषाणूविरोधातील प्रभावी औषध वर्तवली जाण्याची शक्यता आहे.
हे ऐकतांना तुम्हाला नवल वाटेल मात्र हे खरे आहे. येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे की, लाल मुंग्यांची चटणी खाल्याने मलेरिया, डेंगू तसेच खोकला ताप श्वसनाचा त्रास यानसारख्या आजारांवर हि चटणी वापरली जाते. याच कारणामुळे आत या चटणीच्या समावेश रोना विषाणूविरोधातील प्रभावी औषध करावा अशी मागणी येथील आदिवासी लोकांनी केली आहे.
दरम्यान, येथील भागात या चटणीचे नाव चापड़ा चटनी म्हणून प्रसिद्ध असून तेथील निवासी लोकांकडूनही या चटणीची मागणी वाढली आहे. छत्तीसगढ़ आणि झारखंड येथे आठवडी बाजारात फक्त दहा रुपायात विकली जाते. येथील आदिवासी बांधव ही चटणी विकून बऱ्या पैकी कमाई करतांना दिसून आले आहे.
लाल मुंग्यांच्या चटणीचे फायदे
प्रोटीन, जिंक, कैल्शियम और विटामिन बी-12 असते.
ताप मलेरिया पिलिया, नुमोनिया सारखे आजार बरे होतात.