कोविड -19 बाधिक जागतिक मृत्युचा आकडा हजारच्या वर पोहोचला असून लाखपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 40 हजारपेक्षा जास्त लोक करोनामुक्तही झाले आहेत. भारतात करोना व्हायरसमुळे बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, त्यामध्ये काही परदेशी नागरिक देखील आहेत जे भारत दौऱ्यावर गेले होते.
या संसर्गजन्य रोगासाठी निश्चित उपचार न मिळाल्यामुळे, इंटरनेट आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच (मनात येतील असे) उपचार सांगण्यात येत आहेत. म्हणूनच, घाबरून आणि फसवणूकीच्या उपायांवर आणि दाव्यांकडे दुर्लक्ष करून आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यावर आणि आपले आरोग्य सुदृढ बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.
मूलभूत स्वच्छता राखणे हे जसे अत्यंत गरजेचे आहे त्याचप्रमाणे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि आपल्या शरीरास संक्रामक रोगापासून बचाव करण्यासाठी आपल्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक असलेल्या काही अँटीव्हायरल खाद्यपदार्थाची यादी खाली देत आहोत.
1. लसूण – ऍलिसीन नावाच्या सत्वाने भरलेले, एक साधे लसूण नियमितपणे खाल्ल्यास आतून संक्रमण दूर करण्याची क्षमता वाढते असे म्हटले जाते. ऍलिसिन हे असे सत्व आहे जे संक्रमणाशी लढण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त मानले जाते. लसणीची एक पाकळी एकतर चघळूण, चिरून किंवा किसून आपण खाऊ शकतो. ऍलिसिन मुळेच लसूणला एक विशिष्ट वास येतो.
प्रमाण : आपण लसणाच्या दोन पाकळ्या दररोज कोमट पाण्याबरोबर सेवन करू शकता किंवा लसणाची फोडणी देऊन आपल्या रोजच्या जेवणाचा एक भाग बनवू शकता.
दालचिनी – होय, हा सुगंधित मसाला आपल्या आवडीच्या पदार्थांमध्ये केवळ विशेष चव घालण्याशिवाय देखील बरेच काही करू शकतो. रक्तदाब नियंत्रित करण्याच्या त्याच्या सिद्ध क्षमतेव्यतिरिक्त देखील, संशोधनाच्या निष्कर्षांनुसार दालचिनी देखील संक्रमणापासून शरीराचे रक्षण करू शकते.
प्रमाण : आपण सहजपणे दालचिनीची काठी रात्री पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी पिऊ शकता. या व्यतिरिक्त दालचिनी आपण आपल्या सकाळच्या चहा किंवा कॉफी मध्ये घालून देखील त्याची चव वाढवू शकतात.
दही (योगर्ट) : दह्यामध्ये अनेक प्रकारचे प्रोबायोटिक असतात जे श्वसन संक्रमण कमी करण्यास मदत करतात. शिवाय, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉरमेशन (एनसीबीआय) मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, प्रोबियोटिक सेव्हन केल्याने लहान मुलांमध्ये आरटीआय (श्वसनमार्गाचे संक्रमण) होण्याचे प्रमाण कमी होतात, हे सिद्ध झाले आहे.
प्रमाण : दही (योगर्ट) हे विविध स्वादांमध्ये उपलब्ध असल्याने आपण आपल्याला आवडेल त्या स्वादाची निवड करून आपल्या दिवसाची सुरवात हे खाऊन करू शकतात. अथवा आपण आपल्याला आवडत असलेल्या गोडपदार्थ ऐवजीदेखील ह्याचं सेवन करू शकतात कारण हे एक स्वादिष्ट परंतु निरोगी व्यंजन आहे.
मशरूम –
शिताके मशरूम- अगदी अचूक सांगायचे झाले तर बीटा-ग्लूकानने भरलेले आहेत जे अँटीवायरल आणि अँटीबैक्टीरियल संयुगे म्हणून ओळखले जातात. ते केवळ आपल्या प्रतिकारशक्तीला वाढ देण्यात मदत करत नाहीत तर जळजळ कमी करण्यास देखील मदत करतात. आपण मशरूमचे तुकडे बारीक कापून आणि नारळाच्या तेलात हलके शिजवून मशरूमचा आनंद घेऊ शकता.
ज्येष्ठमध चहा (मुलेठी)
प्राचीन काळापासून पारंपरिक चिनी उपायांमध्ये ज्येष्ठमधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉरमेशन (एनसीबीआय) मध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरानुसार, ज्येष्ठमधमध्ये अनेक सक्रिय संयुगे असतात ज्यांचा अँटीवायरल, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीट्यूमर आणि इतर क्रियाकलापांवर औषध म्हणून उपयोग होतो. त्यातील गुणधर्मामुळे, ज्येष्ठमधाचा उपयोग बऱ्याचदा खोकला आणि घशाच दुखण कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
आपण सहजपणे पाण्यात ज्येष्ठमध उकळू शकता आणि नंतर त्या पाण्याचे सेवन करू शकता. किंवा आपण जर सर्दीने त्रासलेले असाल तर ह्या पाण्याचा उपयोग करून आपण त्याचा चहा देखील घेतल्यास फरक पडू शकतो.
– डॉ. त्रिशला चोप्रा