“कांदा मुळाभाजी अवघी विठाई माझी’ हा अभंग आपण सर्वांनी अनेकदा ऐकला असेल. त्यातील मुळ्याच्या उल्लेखातून मुळ्याचे महत्त्व समजते. “मुळा’ ही एक कंद प्रकाराची भाजी आहे. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्येही आपल्या शरीराला आवश्यक असे पोषक घटक असतात. बऱ्याचदा मुळा खाण्यासाठी वापर करण्यात येतो. तर मुळ्याची पाने टाकून देण्यात येतात. मुळ्यात प्रथिनं, कार्बोहायड्रेट, लोह, फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असते. मुळ्याचा उपयोग कोशिंबीर, भाजी, पराठे, रायता आणि लोणचे करण्यासाठी केला जातो.
1. रोजच्या जेवणात कच्चा मुळा किंवा मुळाची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते. तसेच अन्न पचनही व्यवस्थित होते.
2. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. याचे सेवन केल्याने भूक भागविण्यास देखील मदत होते.
3. मुळ्याचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ति वाढविण्यास मदत होते.
4. मुळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही यामुळे लाभ होतो.
5. मुळा किंवा त्याची पाने खाल्ल्यास बॉडीचे टॉक्सिन्स दूर होईल.
6. मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे मुळाच्या सेवनाने सांधेदुखी दूर होते.
7. मुळ्याचा रस घेतल्याने लघवी करताना होणारी जळजळ थांबते.
8. कावीळ झाल्यास जेवणात मुळ्याचा समावेश जरुर करावा.
9. ज्या लोकांची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आणि पोट साफ होत नसेल त्यांनी कच्चा मुळा खायला हवा.
10. मुळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो. मुळा खाल्ल्याने मुळव्याधीचा त्रास असलेल्यांना आराम मिळतो.
डॉ. आदिती पानसंबळ,
आहारतज्ज्ञ, नगर, संपर्क : 738572888