पुणे- आपल्या त्वचेची काळजी घेणारी एक बहुगुणी, बहुउपयोगी अशी वनस्पतीआयुर्वेदात आहे. जिचे नाव आहे कोरफड. कोरफड म्हणजे त्वचेची संजीवनी आहे. कोरफडीचा वापर अनेक औषधांत व सौंदर्यप्रसाधनात केला जातो. तसेच तिचा गर किंवा रसही खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
कोरफड ही फक्त भारतीयांनाच नव्हे, तर इजिप्शियन, रोमन, ग्रीक, अरबी इत्यादी संस्कृतीमध्येही लोकप्रिय आहे. हजारो वर्षांपासून जगातील नावाजलेले वैद्य व डॉक्टर्स तिचा वापर करत आले आहेत.
कोरफडीमध्ये 99 टक्के ते 99.5 टक्के पाण्याचा अंश, असून घन भागात 75 विविध घटकपदार्थ आहेत. जसे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, एनझाइम्स, साखर, फिनॉलिक कंपाउंडस, लिगनिन, सॅपनिन्स, स्टिरॉल्स, अमिनो ऍसिडस आणि सॅलिक ऍसिड. कोरफडीच्या पानामध्ये 75 पेक्षाही अधिक जैविकदृष्ट्या कार्यरत असणारे घटक असतात.
कोरफडीच्या गरात व्हिटॅमिन ड व क सोडल्यास जवळजवळ सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स उपलब्ध आहेत, तर साखरेत मोनॉपॉली व म्यूकोपॉली सॅकरिज्स असे प्रकार उपलब्ध आहेत.
कोरफडीचे उपयोग :
पसूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळू शकते.
परक्त वाहताना थांबवणे किंवा जखमांवर उपयोग होतो.
पभाजलेल्या जखमांना थंडावा देते, पनिद्रानाशावर डोक्यास कोरफड जेल लावल्यास फायदा होतो.
पपोटात घेतल्यास आतड्यांची आतून स्वच्छता होते.
पत्वचेची स्वच्छता, डाग, पुटकुळ्या आणि सुरकुत्यांवरही उपयोगी.
पठराविक हवामानामुळे होणाऱ्या सर्दी खोकल्यासाठी हिचा नियमित पोटातून वापर चांगलाच असतो.
पकांतीचा रुक्षपणा, घट्टपणा, सैलपणा अर्थात थुलथुलीतपणा ह्यावर उपयोगी असते.
पकोरफडीतील सॅपोनिन्समुळे बॅक्टेरिया, व्हायरस व बुरशीवर तीव्र परिणामकारक असल्याने कातडींच्या आजारावर-जसे एक्झिमा इत्यादीवर उपयुक्त असते.
पभाजणे, खरचटणे, कापणे, किडा-मुंगी चावणे, जखमा आणि इतर काही गोष्टींमुळे त्वचेच्या टिश्यूवर जे परिणाम होतात, त्यावर कोरफड हे हमखास गुणकारी आहे.
पकोरफडीच्या पानाच्या आतील बाजूस असलेल्या अर्धपारदर्शक जेलमध्ये दाहप्रतिबंधक गुणधर्म असतात. त्वचेमधील बाधित टिश्यूवर उपचार करून नवीन टिश्यू निर्माण करण्याचे कार्य या जेलमध्ये आहे.
पकोरफडीमुळे बाष्पीभवनाच्या नैसर्गिक प्रक्रियेला अटकाव होतो आणि त्यामुळे वातावरणातील ओलावा तिच्यात शोषला जातो.
पकोरफडीमुळे त्वचेमध्ये ओलावा येतो. त्वचेच्या खराब झालेल्या टिश्यूवर उपचार होतो, त्याचप्रमाणे मुरुम-पुटकुळ्या, काळी वर्तुळे, तांबडे चट्टे (रॅश), किरकोळ कापणे-भाजणे जखमा आणि ऍलर्जिक त्वचा विकारांमध्ये कोरफडीचा उपयोग होतो. कोरफड जेलमध्ये निरोगी त्वचेसाठी आवश्यक असे ई जीवनसत्त्व असते.
पसोरायॅसिससारख्या त्वचेचे पापुद्रे काढणाऱ्या विकारावर कोरफड उपयुक्त आहे. पपाळीच्या विकारात-अंगावरून कमी जाणे, अनियमित पाळी व पॉलिसिस्टीक ओव्हरी सारख्या विकारात 1/2 ते 1 चमचा कोरफड चूर्ण सकाळी नाश्त्यानंतर दुधातून किंवा साखरेच्या पाकातून घेणे- कमीत कमी 3 महिने. मात्र गरोदरपणी घेऊ नये.