एरंड( Castor Oil Benefit )
“काय अगदी एरंडासारखा वाढलाय!’ही संज्ञा एरंडाच्या जोमाने वाढण्यामुळेच आली आहे. एरंड ही जोरात वाढणारी व अत्यंत उपयोगी वनस्पती आहे. ही सर्वत्र असते व पाहिजे त्या तुत भारतात पहायला मिळते.
वातविकारांवर
वातावर हे मोठे औषध आहे. कोणत्याही प्रकारचा वात झाला असेल, पोटफुगी, नळाश्रित वात, अंगातून लचक येते या सर्वावर एरंडमुळाचा काढा अत्यंत गुणकारी आहे.एरंडाची मुळे स्वच्छ धुऊन पाण्यात मंदाग्नीवर उकळावीत.मिश्रण आटू द्यावे.एरंडाचा काढा आठवा हिस्सा शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यावा.औषधम्हणून घेताना त्यात मध घालून घ्यावा. याने वातविकार कमी होतात.
शौचाच्या तक्रारींवर
एरंडाचा काढा जर घेतला तर शौचास साफ होते.
सुजेवर ( Castor Oil Benefit )
एरंडाच्या पानांचे व बियाचे पोटीस करून शेक दिल्यासही सूज उतरते. कोणत्याही प्रकारच्या सुजेवर एरंडाच्या मुळेचा काढा देतात. गुडघे वगैरे सांध्याच्या भागास आलेली सूज एरंडाची पाने वाटून तो लेप गरम करून सुजेवर बांधला असता तसेच पोटात एरंडाच्या मुळांचा काढा सकाळ संध्याकाळ एकेक चमचा घ्यावा. ताबडतोब सांध्याची सूज कमी होते.
बाळंतिणीच्या स्तनाच्या ठणक्यावर
बाळंतिणीच्या स्तनाला सतत बाळाच्या दुधासाठी चोखण्यामुळे सूज येते काही वेळा यामुळे स्तनांना ठणका लागतो. अशावेळी एरंडाची पाने खूपच गुणकारी आहेत. एरंडाच्या पानांच्या वाटून थोडेसे कोमट करून त्याचे पोटिसाने ठणका ताबडतोब कमी होतो.
बाळंतिणीचे स्तनातील दूध कमी करण्यासाठी
काहीवेळा काही बाळंतिणींना अंगावर खूपच दूध येते. त्याचा त्यांना त्रासही होतो. सतत छाती दूधाने भरून आल्याने कधीकधी छातीत दुखूही लागते. अशावेळी या स्त्रियांच्या स्तनातील दूध कमी करणे आवश्यक होऊन बसते. अशावेळी नुसत्या एरंडाच्या पानांचा स्तनांस शेक दिला तरी अंगावरचे दूध कमी होते.
काविळीवर( Castor Oil Benefit )
काविळीवर एरंडा वनस्पती अतिशय गुणकारी आहे.एरंडाच्या पानांचा रस 5 ग्रॅम, त्यात दुप्पट ग्रॅम साखर घालून पोटात घ्यावे लगेचच कावीळ बरी होते.
प्लीहा वाढली असेल तर
एरंडा मुळाचा काढा पोटात घ्यावा. प्लीहा वाढलेल्या ठिकाणी वर एरंडाच्या पानांचे पोटीस बांधावे, प्लीहा कमी होते.
गृधसीवर
एरंडाची दाट लापशीने गृधसी बरी होते. यासाठी ही लापशी कशी करावी हे समजावून घेणे अतिशय महत्वाचे आहे. एरंडाच्या बिया घ्याव्यात. त्या वाटाव्यात. मग पाव लिटर दुध घ्यावते तापवावे. त्यात या वाटलेल्या बिया टाकून 20 ग्रॅम साखर घालून चांगले दाट होईपर्यंत आच द्यावी.गृधसीच्या रोग्याने रोज एक वेळ सकाळी ही दाट झालेली लापशी खावी. याने चांगले एक दोन जुलाब होऊन गृधसी बरी होते.
एरंडेल तेल( Castor Oil Benefit )
एरंडाच्या बियांचे काढलेले तेल जुलाबासाठी फार मोठे औषध आहे. जुलाब होताना पोटात वगैरे दुखत नाही. याने पाण्यासारखे पातळ जुलाब न होता मलाचेच जुलाब होतात. हे अत्यंत सौम्य आहे. जुलाब न होता हे जरी पोटात राहिले तरी काही अपाय करीत नाही. जन्मल्या मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना ह्या तेलाचा जुलाब देण्यास हरकत नाही.दहा ग्रॅमपासून तीन ग्रॅमपर्यंत जुलाबासाठी एरंडेल तेल देतात. एरंडेल तेल सुंठीच्या काढ्यातून घेतल्यावर वास कमी येतो.
( Castor Oil Benefit ) शौचाला साफ न होणे, पोटफुगी, संधिवात, उदरशूल वगैरे सर्व रोगात एरंडेल तेलाचा जुलाब देतात . आमांश झाला असेल, पोट दुखून वारंवार शौचाला जावे लागत असेल व थोडा-थोडा मल पडत असेल, तर पहिल्यापासून एरंडेल तेल घ्यावे एरंडेल तेलाने बरे वाटते. दुसऱ्या औषधाची जरूरीच राहात नाही. ताकाची चूळ भरून टाकली व मग एरंडेल घेतले तर याची चव बिलकुल लागत नाही.
सुलभ प्रसूतीसाठी एरंडेल तेल
सुलभ व नैसर्गिक प्रसूतीसाठी एरंडेल तेल सर्वमान्य आहे. गर्भवती स्त्रियांनी पाचव्या महिन्याच्या पुढे दर महिन्यास वैद्याच्या सल्ल्याने एरंडेल तेल पोटात घ्यावे मग नवव्या महिन्यापासून दर आठ दिवसांनी एरंडेल तेल घ्यावे.याचा परिणाम म्हणजे गरोदर स्त्रियांची प्रसूती सुलभ होते.
वृषण वृद्धीवर
वृषण वृद्धीच्या विकारावर रोज सकाळी एरंडेलाचा जुलाब घ्यावा व रोज दोन वेळा एरंडेल तेलाने मालीश किंवा तेलाने चांगले चोळावे. महिनाभरात वृषण वृद्धी विकार बरा होतो.
(Castor Oil Benefits In Marathi )