सुरमई, पापलेट, रावस, कोळंबी, अशी नावे सुद्धा ऐकली तरी मासे प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं. जवळजवळ सगळ्याच देशात सीफुड लोकांच्या आवडीचा प्रकार आहे. काहींच्या आहारात नियमित माशांचा समावेश असतो.
कोकणात लोक मासे आवर्जून खातात. माशांचा आहारात समावेश करणं फायद्याचे असतं. उत्तम त्वचा, निरोगी केस यासाठी मासे खाणे आरोग्यदायी आहे.
1.मासे खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील. शरीरात इन्सुलिन बनवण्याची प्रक्रिया सुधारते.
2.माशांमध्ये असलेले फिश ऑइल त्वचेसाठी चांगले असते. फिश ऑइल मध्ये व्हिटॅमिन इ असते.
3.माशांमध्ये असलेले ओमेगा 3आणि 6हे केसांना दाट करण्यास मदत करते.
4.माशांमध्ये असलेले ओमेगा झोप सुधारण्यास मदत करते.
माशांमध्ये व्हिटॅमिन डी, ओमेगा
3, ओमेगा 6, प्रोटीन, आयोडीन, फॉस्फरस, झिंक असते.
5.आहारात नियमित मासे असतील तर वजन नियंत्रणात राहते.
6. नियमित मासे खाणाऱ्यांना ह्रदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका कमी असतो.
7. गरोदर महिलांनी बाळाच्या मेंदू व डोळ्यांच्या वाढी साठी मासे खावे.
8. हाय ब्लड प्रेशर असल्यास आहारात माशांचा समावेश करावा. याने ब्लड प्रेशर लो करण्यास मदत होते.
9. मासे खाल्यानंतर दुध टाळावे. फूड पोईसनिंग होण्याची शक्यता असते.
10. जर रोज मासे खाल्ले तर तुमच्या शरीरातील उष्णता वाढू शकते आणि तुमच्या शरीरातील फॅट ही वाढू शकते. आठवड्यातून 2 ते 3वेळाच मासे खा.
11. 100ग्रॅम माशांमध्ये 22ग्रॅम प्रोटीन व 206 कॅलरीज असतात.
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.