Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

tea: ‘कडक चहा’ बनवण्याची ४ गुपितं! दरवेळी गाढ, सुगंधी आणि परफेक्ट चहा तयार होईल

by
November 5, 2025
in लाईफस्टाईल
A A
tea: ‘कडक चहा’ बनवण्याची ४ गुपितं! दरवेळी गाढ, सुगंधी आणि परफेक्ट चहा तयार होईल
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

tea: हिवाळा सुरू झाला की चहाच्या चाहत्यांची संख्या वाढते. थंड वातावरणात गरमागरम, कडक आणि गाढ चहा प्यायची मजाच वेगळी असते. पण अनेकदा चहा फीका, पातळ किंवा बेस्वाद बनतो आणि त्याची चवच बिघडते. मात्र काही सोप्या आणि खास टिप्स लक्षात ठेवल्या, तर चहा नेहमी परफेक्ट तयार होऊ शकतो. चला जाणून घेऊ या त्या ४ गुपितांबद्दल.

१. मसाल्यांचा सुगंध खुलवणे

चहा बनवताना पहिली पायरी म्हणजे इन्फ्युजन, म्हणजेच पाण्यात मसाल्यांचा स्वाद उतरवणे.
बर्‍याच जणांची चूक अशी असते की ते पाणी, दूध आणि चहा पत्ती एकत्र टाकतात, त्यामुळे मसाल्यांचा अस्सल स्वाद खुलत नाही.

योग्य पद्धत अशी,
तीन कप चहासाठी तीन कप पाणी घ्या. पाणी उकळायला लागल्यावर गॅस मध्यम करा आणि त्यात ठेचलेलं आलं, वेलदोडा आणि लवंग टाका. हे मिश्रण सुमारे तीन मिनिटं उकळा, म्हणजे मसाल्यांचा स्वाद नीट पाण्यात उतरतो.

२. चहा पावडर फुलणं

मसाले उकळल्यावर पुढचं पाऊल म्हणजे ब्लूमिंग. म्हणजेच चहा पावडरचा रंग, सुगंध आणि चव नीट खुलणं.
यासाठी गरम पाण्यात चहा पावडर टाका आणि ताबडतोब साखर घाला.

साखर नेहमी चहा पत्तीसोबतच टाकावी.
जर दूध टाकल्यानंतर साखर घातली, तर साखर विरघळताना पाणी सोडते आणि चहा पातळ होतो.

चहा मध्यम आचेवर काही वेळ उकळा आणि चमच्याने हळुवार ढवळा, जेणेकरून चवींचं मिश्रण छान बनेल.

३. गाढपणा आणणारी पायरी

चहा कडक आणि गाढ व्हावा यासाठी ही पायरी महत्त्वाची आहे.
थंड दूध थेट चहात घालण्याची चूक करू नका. त्यामुळे चहाचं तापमान झपाट्याने कमी होतं आणि फ्लेवर बिघडतो.

दूध आधीच बाहेर काढून ठेवा, ते खोलीच्या तापमानाला आलं की चहात टाका.
चहा उकळताना चमच्याने हलवत राहा, म्हणजे रंग, चव आणि दाटपणा नीट येईल.

४. चहाचा सुगंध खुलवणे

चहा कपात गाळल्यानंतर त्यावर थोडंसं वेलदोडा किंवा दालचिनी पावडर भुरभुरा.
असं केल्याने चहाचा सुगंध अधिक खुलतो आणि पिताना ताजेतवाने वाटतं.

काही महत्त्वाच्या सूचना

आलं कधीही किसून टाकू नका, त्यामुळे चहा कडू बनू शकतो.
साखर नेहमी चहा पावडर बरोबरच घाला.
कडक चहा हवा असल्यास तो नीट उकळा, घाई करू नका.

ह्या चार पायऱ्या पाळल्या, तर तुमचा चहा दरवेळी गाढ, सुगंधी आणि परफेक्ट बनेल.
आता प्रत्येक सकाळी मिळेल हवी तशी ‘कडक चहा’ची मजा!

Join our WhatsApp Channel

The post tea: ‘कडक चहा’ बनवण्याची ४ गुपितं! दरवेळी गाढ, सुगंधी आणि परफेक्ट चहा तयार होईल appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar