पुणे – सुरूवातीस म्हंटल्याप्रमाणेच ऑटिझम (autism kids) हा कोणताही रोग नसून ती एक मानसिक जन्मस्थ अवस्था आहे. ऑटिझम(autism kids)वर तो पूर्णपणे बरा होण्यासाठी कोणताही उपचार किंवा उपाय करणे शक्य नाही. परंतु आपल्या प्रयत्नातून आपण ऑटिझमग्रस्त मुलांना एक चांगले आणि आरोग्यदायी मानसिक तसेच शारीरिक आयुष्य देऊ शकतो. अशा मुलांना गरज असते ती केवळ मानसिक आधाराची, कोणीतरी समजून घेण्याची आणि त्यांच्यावर त्या अवस्थेतही प्रेम करण्याची.
ऑटिझम (autism kids) या अवस्थेचे प्रमाण आजमितीला तसे कमी असले तरीही त्याचे वाढते प्रमाण ही नक्कीच गंभीर बाब आहे. आपल्या मुलाला ऑटिझम(autism kids)सारखा आजार आहे हे कळल्यानंतर बहुतांश पालक सुरूवातीस हे स्वीकारायलाच तयार नसतात आणि स्वीकारले तरीही त्यांना ते फारशे मान्य होणारे नसते. मानसिक आजार हा मुळातच आपल्याकडे गंभीर प्रकार समजला जातो. ऑटिझम (autism kids) हा जन्मत: होणारा आजार असल्याने तो समजण्यास वेळ लागतो. म्हणजेच मुल दोन ते तीन वर्षांचे होईपर्यंत त्याची हालचाल, सहज-साध्या शरीरक्रियांमधील त्याचे बदल आणि कोणत्याही गोष्टीला मानसिकरित्या प्रतिसाद देण्याची त्याची क्षमता यावरून त्याच्यातील ऍबनॉर्मल असण्याची लक्षणे समोर येतात. या प्रक्रियेला जरा वेळच लागतो.
आणि अचानक हे समोर आल्यानंतर पालकांचा धीर खचतो. या अवस्थेत काय करावे आणि आपल्या मुलाला नेमकेपणाने यातून बाहेर कसे काढावे यासाठीचे प्रयत्न मग सुरू होतात. इथे पालकांच्या सहनशक्तीचा कस लागतो. परंतु आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या ऑटिझमग्रस्त मुलाबद्दल केवळ सहानुभूती न दाखवता त्याला एक प्रगल्भ मानसिक आणि शारीरिक आयुष्य कसे देता येईल याकडे विशेष लक्ष देणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी असल्याची जाणीव अधोरेखित केली पाहिजे.
तुमच्या मुलामध्ये ऑटिस्टीकचे किंवा ऑटिझम(autism kids)चे निदान झाल्यानंतर पालकांनी खचून न जाता, परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे फार गरजेचे आहे. यासाठी पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दलच्या काही टीप्स –
संभाषण वाढवा –
ऑटिस्टिक मुले फारशी इतरांमध्ये मिसळत नाहीत. ती स्वतःच्याच विश्वात रममाण असतात. त्यामुळे अशा मुलांशी संयमाने वागा. त्यांना सतत गोष्टी, गाणी ऐकवा. त्यांच्याशी सतत बोलत राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे ही मुले समाजात मिसळण्यास मदत होईल. यामुळे सारीच परिस्थिती एकदम बदलणार नाही. परंतू काही प्रमाणात सुधारणा नक्की होईल.
इतरांबरोबर अधिक मिसळू द्या –
ऑटिस्टिक मुलांना समाजात किंवा इतरांमध्ये मिळून मिसळून राहणे फारसे जमत नाही. त्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्या. त्यांचा एकलकोंडेपणा दुर करण्यासाठी त्यांना नर्सरी किंवा प्ले स्कुलमध्ये पाठवा. ज्याठिकाणी मुले विविध आकाराच्या रंगांच्या खेळण्यांसोबत खेळतील. यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल. तसेच ऑटिस्टिक मुले काही विशिष्ट रंग किंवा आवाज टाळतात. त्याच्याशी संपर्क आल्यास मुले हिंसक बनतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
प्रोसेस्ड अन्नपदार्थ देणे टाळा –
जंकफुड्चे सेवन हे मानवी शरीरासाठी अपायकारक आहे. त्यामुळे ऑटिस्टिक मुलांमध्येही जंक व प्रोसेस्ड अन्नपदार्थांचा समावेश टाळा. अशा पदार्थांमुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
इलेक्ट्रॉनिक वस्तू दूर ठेवा –
तुमच्या मुलामध्ये ऑटिझमचे निदान झाले असेल, तर त्यांना टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम अशा वस्तूंपासून दुर ठेवा. कारण अशा उपकरणांच्या वापरामुळे, अशा मुलांचा मानसिक विकास खुंटण्याची शक्यता असते. त्यापेक्षा विविध प्रकारची गाणी, चांगले शांत संगीत,बालगीते त्यांना ऐकवा, बौद्धिक विकास करणाऱ्या खेळण्यांचा त्यांना अधिकाधिक वापर करायला द्या. यामुळे त्यांच्या मेंदुला चालना मिळेल.
औषधांपेक्षा थेरपी प्रभावी –
ऑटिस्टिक मुलांमध्ये बदल घडवण्यासाठी, औषधांपेक्षा विविध थेरपीच अधिक प्रभावशाली ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. एप्लाइड बिहेव्हिअरल ऍनालिसिस व रिलेशनशीप डेव्हलपमेंट इंटरवेन्शन या दोन अत्यंत प्रभावी थेरपींचा दिवसातून 4 ते 5 वेळेस जरूर वापर करा.