नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून मातांना पोषण आणि काळजीबाबत, समुपदेशनातून प्रिमॅच्युअर बेबीज अर्थात निर्धारित वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. बाळांच्या जन्मावेळी पोषण आणि वाढीच्या टप्प्यांसंदर्भात समुपदेशन न मिळालेल्या मातांच्या तुलनेत समुपदेशन मिळालेल्या माता चार पट अधिक तयार असतात, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
वेळेआधी जन्मलेल्या बाळांच्या मातांसाठी केलेल्या एका नवीन सर्वेक्षणात, वेळेआधी जन्मलेल्या बाळांच्या मातांसाठी पोषणावर भर आणि आणि समुपदेशनाची गरज यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्यांना निरोगी बालके जन्माला घालण्यासाठी सुसज्ज करण्यात आले आहे. नवजात बालकांच्या मातांना वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या वाढीच्या टप्प्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या शारीरिक आणि सर्वागीण वाढीचे टप्पे आणि विशेष पोषण याबाबत मार्गदर्शन केल्याने बराच फायदा होतो. वेळेआधी जन्मलेल्या बाळांना वेळेत जन्मलेल्या बाळांसोबत आरोग्याच्या सर्व निकषांवर टिकून राहण्यासाठी महत्त्वाच्या हस्तक्षेपामध्ये क्वॉलिटी ऑफ सरव्हायव्हल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथील 1000 पेक्षा अधिक मातांचे सर्वेक्षण केले असून त्यांच्या चिंता आणि मुलांबाबतच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. ( premature baby information in marathi )
एनआयसीयू, ज्ञानकेंद्र निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू) हा मातांसाठी माहिती मिळवण्याचा सुरुवातीचा टप्पा आहे. ज्या मातांना एनआयसीयूमध्ये पुरेसे आणि संबंधित समुपदेशन मिळाले, त्या वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळाला वाढवण्यासाठी चारपट अधिक सुसज्ज होत्या. त्यांनी स्तनपान, पोषण आणि शारीरिक, मानसिक विकासाबाबतही माहिती मिळवली.
माहितीची तफावत अस्तित्वात आहे :
थोडया, पण महत्त्वाच्या सर्वेक्षण करण्यात आलेल्या महिलांपैकी 10 टक्के स्त्रियांना आपल्या वेळेपूर्वी जन्मलेल्या मुलाच्या व्यवस्थापनाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. सुमारे 40 टक्के महिलांना वेळेपूर्वी जन्म आणि त्यांच्या वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या पोषणाची, आरोग्याची आणि मानसिक विकासाची काळजी आणि स्वत:ची काळजी यांच्याबाबत अंशत: माहिती किंवा शून्य समुपदेशन मिळाले. ( premature baby information in marathi )
वेळेत जन्मलेल्या मुलांसोबत तग धरणे :
पूर्ण वेळेनंतर जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत, वेळेआधी जन्मलेल्या मुलांना भेडसावणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांची माहिती सर्वेक्षण करण्यात आलेल्या जवळपास सर्व स्त्रियांना होती; परंतु वाढीबाबत या मुलांसोबत येण्यासाठी नेमका कशाचा फायदा होऊ शकेल, याची त्यांना माहिती नव्हती. सर्वेक्षण करण्यात आलेल्या महिलांपैकी 93 टक्के महिलांना वाढीच्या प्रत्यक्ष टप्प्यांबाबत आव्हाने भेडसावली, जसे वजनवाढ आणि त्यामुळे त्यांनी त्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर अर्ध्यापेक्षा कमी महिलांनी मेंदूचा विकास, हालचाल आणि मोटर स्किल्स ही विकासाची महत्त्वाची बाब असल्याचे मानले. ( premature baby information in marathi )
दोन वर्षापर्यंत प्रतिकारशक्ती :
कमी प्रतिकारशक्ती आणि आजारातून बरे होण्यासाठी घेतलेला जास्त वेळ ही पहिल्या दोन वर्षामधील वेळेआधी जन्मलेल्या मुलांसमोरची प्रमुख आव्हाने होती. मुलांच्या जन्माच्या पहिल्या 12 महिन्यांमध्ये ताप, सर्दी, कमी भूक आणि श्वसनाच्या समस्या हे काही प्रमुख प्रश्न होते. पहिल्या तीन ते नऊ महिन्यांमध्ये प्रतिकारशक्ती हा मुख्य काळजीचा विषय होता, तर मुलाचे वय वाढेल तसतसे तो कमी होत गेला.
पोषण वेळेपूर्वी जन्मलेल्या मुलांचे लक्ष स्तनपानाच्या वेळी सहजपणे दुसरीकडे वळवले जाऊ शकत होते आणि आईला लुचताना त्यांना समस्या होत होती. सर्वेक्षणातून हे दिसून आले की, ही मुले मुख्यत्वे पर्यायी आहारावर अवलंबून होती आणि मातांनासुद्धा वेळेपूर्वी जन्माला आलेल्या मुलांना वयाची दोन वष्रे पूर्ण करेपर्यंत कितीवेळा आणि किती खाऊ घालायचे हे माहीत नव्हते. ( premature baby information in marathi )
सर्वेक्षण करण्यात आलेल्या मातांमध्ये आणखी एक महत्त्वाचा काळजीचा विषय म्हणजे वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळाची काळजी घेत असताना स्वत:च्या भावनांशी जुळवून घेणे, त्यांना कठीण जात होते. ताण आणि ट्रॉमा यांच्याशी सामना करण्यासाठी फक्त 24 टक्के मातांना समुपदेशन करण्यात आले होते. सर्वेक्षणातून हे दिसून आले की, जन्मानंतर सर्व मातांना स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक गरजांची आणि त्यानंतर बाळाच्या आरोग्य आणि पोषणाशी संबंधित काळजीही करावी लागते.
वेळेत समुपदेशनाची गरज :
भारतात वेळेपूर्वी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण वाढू लागले आहे; परंतु अशा मुलांना वाढवणे, हे मातांसाठी अत्यंत आव्हानाचे ठरते आहे. डॉक्टर्स, काळजीवाहक आणि कुटुंब एकत्रितरीत्या बाळांच्या आरोग्याच्या समस्यांवर मात करू शकतात.
सर्वेक्षणातून हे दिसून येते की, जाणीवजागृती आणि वेळेत समुपदेशन या दोन गोष्टी अशा आहेत, जिथे मातांना मदत आणि सल्लयाची गरज आहे. एनआयसीयूमधील डॉक्टरांनी वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांमध्ये स्तनपान, काळजी आणि विकासाची ध्येये साध्य करण्याबाबत योग्य ज्ञान देणे महत्त्वाचे आहे. योग्य काळजी आणि योग्य पोषणाद्वारे वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांच्या जीवनाचा दर्जा, एकूण वाढ आणि सर्वांगीण विकासात सुधारणा करणे शक्य आहे.
बालकांच्या आरोग्याबाबत जागरूकता : ( premature baby information in marathi )
क्वॉलिटी ऑफ सर्व्हायव्हल सर्व्हेने वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांकडे मातांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची सर्वांना संधी दिली आहे. आरोग्यसेवा पुरवठादार आणि एनआयसीयू नर्सेसनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करायला हवा आहे. त्यांनी मातांना पहिल्या टप्प्यातील समुपदेशनाचे सहकार्य केले आहे. वेळेपूर्वी जन्मलेल्या बालकांच्या काळजीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी बालआहार तज्ज्ञांकडून प्रशिक्षण आणि पॅरामेडिक्ससाठी जागतिक वैद्यकीय प्रशिक्षण असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडून स्तनपानाला चालना देण्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. असे एकत्रित प्रयत्न माहितीची तफावत भरून काढतील आणि निरोगी मुलांना वाढवण्यासाठी मातांचे सबलीकरण होईल, अशी आरोग्य विभागाला आशा वाटते.
पोषण, काळजी आणि सेवा :
प्रिमॅच्युअर बेबीजना वाढवणे, हे वेळेत जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत वेगळे असते. त्यांचा प्रवास वेगळा असतो, त्यांच्या पोषण, काळजी आणि सेवा यांच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. पोषण ही बाळांमधील मेंदू आणि सर्वागीण विकासाची गुरुकिल्ली आहे.
मातांना शारीरिक टप्पे लक्षात येतात; परंतु मेंदूचा विकास हा वेळेपूर्वी जन्मलेल्या बालकांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. आयुष्याच्या पहिल्या वर्षात बाळाचा मेंदू विकसित होतो आणि आयुष्यातील इतर कोणत्याही वेळेच्या तुलनेत ते न्यूरल संपर्क अत्यंत वेगाने जोडतात. त्यामुळे डीएचए आणि नसर्गिक ई जीवनसत्त्वांसाठी मेंदूची पोषक तत्त्वे बालकाच्या आहाराचा भाग असतील हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ( premature baby information in marathi )