पावसाळ्यात वातावरण खूपच कुंद आणि दमट असते परिणामी त्वचेवर पुरळ आणि इन्फेक्शन होऊ शकते. रॅशेस, क्रॅडल कॅप आणि केसांना सूटणारी कंड या साधारणपणे पावसाळ्यात आढळणाऱ्या समस्या आहेत. आपल्या लहान मुलांच्या अतिशय कोमल अशा त्वचेची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करत येथे काही टिप्स दिल्या आहेत.
बाळाच्या त्वचेची काळजी घेतांना योग्य उत्पादनाची निवड करून हवामानानुसार काळजी घ्यावी. पालकांनी अतिशय मृदू आणि मुलायम लहान मुलांची उत्पादने वापरावित. अशी उत्पादने ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑलिव्ह ऑईल, ग्रीन ग्राम, जास्वंद, लोव्हेरा, नटग्रास ऑईल आणि तिळाचे तेल यांनी युक्त उत्पादने वापरावीत जेणे करून आपल्या बाळाची त्वचा ओलसर राहून तिला पोषण मिळून पावसाळ्यात साधारणपणे होणाऱ्या त्वचेच्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकेल.
मातांनी बाळाच्या आंघोळीसाठी नेहमी मृदू साबण वापरावा ज्यामध्ये ऑलिव्ह ऑईल आणि बदामाचे तेल असेल. ऑलिव्ह ऑईलमुळे त्वचेला पोषण मिळते आणि बदामाच्या तेलाने बाळाच्या त्वचेतील ओलावा टिकून राहतो. मृदू असा बेबी वॉश सुध्दा वापरता येऊ शकेल यांत ग्रीन ग्राम आणि चीकपी सारखे घटक असून ग्रीन ग्राममुळे त्वचा मुलायम राहून त्वचेला आराम मिळतो.
पावसाळ्यात त्वचे बरोबरच केसांची काळजी घेणेसुध्दा महत्त्वाचे असते. म्हणूनच पावसाळ्यात किमान आठवड्यातून दोनदा बाळाच्या डोक्यावरून स्नान घालणे आवश्यक असते. यामुळे क्रॅडल कॅपपासून बचाव होऊन डोक्याची त्वचा आणि केसांना पोषण मिळते. पालकांनी जास्वंदयुक्त मृदू शॅम्पू वापरावा. त्यामुळे त्वचेला पोषण मिळून केसांत ओलावा राहतो.
स्नानानंतर त्वचेसाठी कॅलामाईनवर आधारीत लोशन आणि नैसर्गिक उत्पादनांनी युक्त म्हणजेच लोव्हेरा, नटग्रास ऑईल आणि तीळाचे तेल असलेले लोशन लावावे ज्यामुळे रॅशेस व त्वचेला होणारा त्रास कमी होतो.
पावसाळ्यात बाळाच्या त्वचेचे प्रादुर्भावापासून आणि रॅशेसपासून रक्षण करण्यासाठी बाळाची त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा. त्याचबरोबर
नियमितपणे डायपर्स बदला ज्यामुळे रॅशेस पासून सहज बचाव होऊ शकेल.