कुणाला होतो स्तनाचा कॅन्सर?
अधिक रुग्ण 48-52 वर्षाच्या आसपास असतात
विशी -तिशीच्या तरुण वयात देखील होऊ शकतो
बहुतेक रुग्णांना कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री नसते
गरोदर अवस्थेत आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनासुद्धा होऊ शकतो
उतार वयात 70-80 च्या महिलांना देखील होतो
पुरुषांना सुद्धा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो
कोणत्या लक्षणांची दखल घ्यावी ?
स्तनामध्ये गाठ किंवा दाटी
निप्पल मधून असामान्य स्त्राव
स्तनाच्या त्वचेमधे लाली किंवा खडबडीतपणा
स्तनाच्या आकारात बदल
निप्पलचा भाग आत खचणे
काखेमध्ये गाठ होणे
ब्रेस्ट कॅन्सर ची शक्यता कशी कमी कराल ?
नियमित व्यायाम करा
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
मेनोपॉझ नंतर हॉर्मोन्स ची औषधे टाळा
वजनावर नियंत्रण ठेवा
आहारात फळं -भाज्या जास्त, व तेल-तूप कमी ठेवा
तक्रार असल्यास काय करावे?
स्वतः चे निदान स्वतः करायला जाऊ नका
स्तनरोग विषयात तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरना भेटा
तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या करा
खात्रीपूर्वक निदान होईपर्यंत धीर धरा
बहुतेक तक्रारी कॅन्सरमुळे नसून 39;बिनाइन39; असतात आणी
अगदीच कॅन्सर असला तरी तो पूर्ण बारा होऊ शकतो हे ध्यानात ठेवा.
काही तक्रार नसेल तर काय तपासण्या कराव्या?
20 वर्षांनंतर महिन्यातून एकदा स्वतःचे स्तनपरीक्षण करा (Self Breast Exam)
30 वर्षांनंतर डॉक्टरांकडून स्तनाची तपासणी करुन घ्या ( Clinical Breast Exam )
40 वर्षांपासून अनुभवी केंद्रात जाऊन मॅमोग्राफी ची वार्षिक तपासणी करा