Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Swasth Bharat Portal: देशात ‘स्वस्थ भारत पोर्टल’ लाँच; आता एका क्लिकवर मिळणार सरकारी उपचार, जाणून घ्या सर्वकाही

by
May 7, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Swasth Bharat Portal: देशात ‘स्वस्थ भारत पोर्टल’ लाँच; आता एका क्लिकवर मिळणार सरकारी उपचार, जाणून घ्या सर्वकाही
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Swasth Bharat Portal: देशातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते ‘स्वस्थ भारत पोर्टल’चे (Swasth Bharat Portal) अधिकृत लाँचिंग करण्यात आले. या पोर्टलमुळे आता नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सरकारी आरोग्य सेवांची माहिती आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आरोग्य डेटाचे एकत्रीकरण –

देशातील आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठी अडचण म्हणजे विखुरलेला डेटा. आतापर्यंत आरोग्यविषयक माहिती वेगवेगळ्या सिस्टममध्ये विभागलेली होती. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन पोर्टलची रचना अशा प्रकारे केली आहे की सर्व विखुरलेले डेटासेट्स एकाच व्यासपीठावर येतील. यामुळे आरोग्य विभागाला एकाच माहितीची वारंवार नोंद करावी लागणार नाही, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होईल.

फ्रंटलाईन वर्कर्सचा ताण होणार कमी –

आशा वर्कर्स (ASHA), एएनएम (ANM), आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांना आतापर्यंत विविध कामांसाठी वेगवेगळी Apps वापरावी लागत होती. मात्र, आता, सर्व सरकारी आरोग्य योजना एकाच पोर्टलवर उपलब्ध असतील. वारंवार विविध अ‍ॅप्स उघडण्याची कसरत थांबणार आहे. मंत्रालयाच्या अंदाजानुसार, यामुळे कर्मचाऱ्यांचे काम सुमारे ४० टक्क्यांनी कमी होईल. पायाभूत सुविधांवरील खर्चात २० ते ३० टक्के बचत होण्याची शक्यता आहे.

‘आभा’ (ABHA) आणि डेटा सुरक्षा –

मृतांच्या किंवा रुग्णांच्या आरोग्याचा संपूर्ण डेटा ‘आभा’ आयडीच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील. रुग्ण आपल्या संमतीने ही माहिती डॉक्टर किंवा रुग्णालयाला दाखवू शकतील. यामुळे डॉक्टरांना रुग्णाची ‘मेडिकल हिस्ट्री’ समजून घेऊन अचूक उपचार करणे सोपे जाणार आहे.

भविष्यातील विस्तार –

सरकार आगामी काळात या पोर्टलचा आणखी विस्तार करणार आहे. यामध्ये खासगी व सरकारी डॉक्टरांची यादी आणि रुग्णालयांची माहिती जोडली जाईल. यामुळे सामान्यांना नेमके उपचार कुठे घ्यायचे, याची स्पष्टता मिळेल आणि सरकारला आरोग्य सेवांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल.

दरम्यान, ‘स्वस्थ भारत पोर्टल’मुळे देशातील सरकारी उपचार पद्धती केवळ वेगवानच होणार नाही, तर ती अधिक सुटसुटीत आणि लोकाभिमुख होणार आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar