साहित्य ः एक वाटी बारीक चिरलेला कोबी, उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे चार, दोन कांदे, श्रावण घेवडा बारीक चिरलेला अर्धी वाटी, दहा- बारा हिरव्या मिरच्या, मीठ, छोटासा आल्याचा तुकडा, कोथिंबीर, अर्धे लिंबू, एक ते दीड वाटी डाळीचे पीठ, तळणीसाठी तेल.
कृती ः उकडलेले बटाटे किसणीवर किसावेत अगर हाताने कुस्करावेत. कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिरच्या- आले वाटून घ्यावे. कुस्करलेला बटाटा, कांदा, कोबी, घेवडा, कोथिंबीर, आले- मिरच्यांचे वाटण, मीठ, थोडी साखर घालून लिंबू पिळून सारखे करावे. त्याचे छोटे छोटे चपटे वडे करावेत. डाळीच्या पिठात थोडेसे तिखट-मीठ घालून भज्याच्या पिठाइतपत सैल भिजवावे.कढईत तेल तापत ठेवून वडे पिठात बुडवून तळून घ्यावेत. बरोबर कुठलीही ओली चटणी अगर सॉस द्यावा. नुसतेही छान लागतात.