[[{“value”:”
Summer News : तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उन्हाचा तीव्रतेने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे अवघड बनले आहे. उष्णतेमुळे उष्माघात, चक्कर येणे आणि इतर आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक ठरले आहे.
अशा परिस्थितीत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
काय करावे :
– पुरेसे पाणी प्यावे. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
– घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
– दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
– सूर्यप्रकाशा पासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.
– हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
– प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
– उन्हात काम करताना टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
– शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.
– अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
– पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
– कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
– पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर काम करत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
काय करु नये?
– उन्हात अतिकष्टाची कामे करू नये.
– दारु, चहा, कॉफी, कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये.
– दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
– उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
– लहान मुलांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
– गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
– बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
– उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे आणि खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.
“}]]
