Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Summer Health Care Tips : कडक उन्हामुळे वाढताहेत आरोग्याशी संबंधित समस्या? मग अशी घ्या स्वतःची काळजी

by
March 13, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Summer Health Care Tips – गेल्या दोन दिवसांपासून शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. यामुळे स्वतःचा बचाव करीत असताना उष्म्याचा त्रास होऊ नये यासाठीही काळजी घ्यावी लागत आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे.

उन्हामुळे सातत्याने शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामामुळे अशक्तपणा वाढतो. त्याशिवाय डोकेदुखीचं प्रमाणही वाढतं. काहींची अवस्था हात-पाय गळल्यासारखी होते. सध्या महाराष्ट्रात सर्वत्रच तापमानाचा पारा चढता आहे.

वाढत्या उन्हाळामुळे जिवाची काहिली होऊ लागल्याने दुपारी बारानंतर बाहेर पडणं कठीण झालं आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

अशातच काहींना बाहेर फिरण्याशिवाय पर्याय नसतो. तरीही उन्हात बाहेर फिरताना गॉगल वापरणं, डोक्यावर टोपी घालणं किंवा रस्त्यांवर उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत अशा सूचना डॉक्टरांकडून करण्यात येत आहेत. त्याशिवाय सातत्याने शरीरातून घाम बाहेर फेकला जात असल्याने डिहायड्रेशन होण्याचं प्रमाणही वाढू लागलं आहे.

डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, अशक्तपणाबरोबर डोकेदुखी वाढल्याचं निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवलं जात आहे. अशावेळी सातत्याने पाणी पित राहणं, लिंबू सरबत, कोकम अथवा फळांचा रस प्यावा, ताक, ओआरएस घ्यावं, असा सल्लाही डॉक्टर देतात.

दुपारच्या वेळी भूक लागत असल्याने अनेकांना मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते; परंतु उन्हात फिरून आल्यानंतर दुपारी मसालेदार पदार्थ खाल्ले, तर पोटाचे विकार बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच मसाल्याचे पदार्थ खाणं टाळावं.

अशी घ्या काळजी….

– हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

– बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा.

– प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

– अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा चटका बसण्याची लक्षणं आहेत.

– घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

– कामाच्या ठिकाणी जवळच थंड पाणी पिण्यासाठी व्यवस्था करावी.

– गर्भवती महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.

– शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओरआरएस, घरी तयार केलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक याचं सेवन करावे.

– रस्त्यावरील फळे लगेच खाऊ नये. चांगले स्वच्छ करून आणि फ्रीजमध्ये काही वेळ ठेवून नंतर खा.

हे देखील वाचा :

Sunstroke : ‘सनस्ट्रोक’ म्हणजे नेमकं काय? उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल? वाचा…

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar