तारुण्यावस्थेतील मुली आणि मुलांनाही सर्वात महत्वाचा आणि जास्त प्रमाणात भेडसावणारा त्रास म्हणजे पिंपल्स. संस्कृतातील मुखदुषिका या शब्दाचा अर्थ होतो मुख दुषित करणारे. यालाच पूढे युवानपिडका असाही शब्द आहे. ( ayurvedic treatment for pimples in marathi )
विशेषत: तारुण्यावस्थेत हे येत असल्याने याला तारुण्यपिटिका असेही म्हंटले जाते. यालाच आपण आजच्या काळात पिंपल्स असे संबोधतो. तारुण्यावस्थेत हे पिंपल्स येण्याचे मुख्य कारण म्हणजे या वयात मुलांचे रक्त हे सळसळते असते. म्हणजेच राग, लोभ या सर्व भावना अतिशय उत्कट असतात. रागाच्या भरात टोकाच्या भूमिका घेतल्याने पित्त खवळते आणि त्याचा प्रकोप होऊन मग पिंपल्स येतात.
यावर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे रात्रीचे जागरण टाळणे आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करू नये. जेवणात दुध, तूप, फळे असा सात्विक आहार घ्यावा. मानसिक रोगावर नियंत्रण ठेवावे. यांसारख्या काही बाबी कटाक्षाने पाळल्यास पिंपल्स कमी होण्यास मदत होते. ( ayurvedic treatment for pimples in marathi )