Sunday, August 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Stomach Problems: पोटदुखी दुर्लक्षित करू नका! आतड्यांचे आजार वाढतायत; स्वच्छता, योग्य आहार आणि तपासणी गरजेची

by
March 12, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Stomach Problems: पोटदुखी ही अनेकांना सामान्य वाटणारी समस्या असली तरी तिच्यामागे आतड्यांचे आजार दडलेले असू शकतात. त्यामुळे पोटाशी संबंधित त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी आणि उपचार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आपल्या पोटातील आतडे हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आतड्यांचे दोन प्रकार असतात. लहान आतडे आणि मोठे आतडे. या दोन्हींची कामे वेगवेगळी असली तरी शरीर निरोगी ठेवण्यासाठी दोन्हींचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असते.

लहान आतड्याचे कार्य आणि आजार  (Stomach Problems)

लहान आतडे जठरानंतर सुरू होऊन मोठ्या आतड्याच्या सुरुवातीपर्यंत असते. अन्नपचनाची मुख्य जबाबदारी लहान आतड्यावर असते. अन्नातील कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे पचन याच भागात होते. तसेच शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील लहान आतड्यांमधून शरीरात शोषली जातात.

लहान आतड्यांमध्ये मुख्यतः दोन प्रकारचे आजार आढळतात. पहिला म्हणजे जंतांमुळे होणारे आजार. अस्वच्छता, हात न धुणे, शौचालयाचा वापर न करणे किंवा भाजीपाला आणि मांसाहार नीट धुवून न खाणे या चुकीच्या सवयींमुळे जंतांचा संसर्ग होतो. त्यामुळे टायफॉईडसारखे आजार होऊ शकतात आणि अन्नपचनाची क्षमता कमी होते. परिणामी रक्तक्षयही होऊ शकतो.

लहान आतड्याचा दुसरा गंभीर आजार म्हणजे पोटाचा क्षयरोग. हा आजार लहान आणि मोठ्या आतड्यांच्या जोडीलगत होतो. अनेक वेळा या आजाराचे निदान उशिरा होते. मात्र बेरियम एक्स-रे, सीटी स्कॅन आणि आयलिओकोलोनोस्कोपी यांसारख्या तपासण्यांमुळे याचे अचूक निदान करता येते. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

मोठ्या आतड्याचे कार्य आणि आजार  Stomach Problems

मोठे आतडे साधारण ७० ते ८० सेंटीमीटर लांबीचे असते. पचनानंतर उरलेल्या अन्नातील आवश्यक घटकांचे शोषण करणे आणि शौच तयार करून बाहेर टाकणे हे मोठ्या आतड्याचे मुख्य काम असते.

मोठ्या आतड्यांशी संबंधित प्रमुख आजारांमध्ये कोलायटिस आणि बद्धकोष्ठता यांचा समावेश होतो. वारंवार शौचास जाणे, पोटदुखी, शौचास साफ न होणे किंवा शौचास रक्त येणे ही कोलायटिसची लक्षणे आहेत. पूर्वी अशुद्ध पाण्यामुळे होणारा अमीबिक कोलायटिस जास्त दिसत होता. मात्र आता बेकरी पदार्थ आणि डबाबंद अन्नामुळे अल्सरेटिव्ह कोलायटिसचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

शौच तपासणी आणि कोलोनोस्कोपीद्वारे या आजाराचे अचूक निदान करता येते. कोलोनोस्कोपीमुळे मोठ्या आतड्याचा कर्करोगही लवकर ओळखता येतो. त्यामुळे सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ कोलायटिसचा त्रास असल्यास ही तपासणी करणे आवश्यक आहे.

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी काय करावे?

बद्धकोष्ठता हा आजार विशेषतः वयस्कर, कमी शारीरिक हालचाल करणारे, मधुमेह किंवा संधिवात असलेल्या लोकांमध्ये जास्त आढळतो. दोन-तीन दिवस शौचास न होणे किंवा शौच करताना खूप त्रास होणे ही त्याची लक्षणे आहेत.

हा त्रास टाळण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे, चालणे किंवा योगासने करणे, अन्न चावून खाणे, बेकरी पदार्थ टाळणे, वेळेवर शौचास जाणे आणि आहारात पालेभाज्या व तंतुमय फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. बाजारात मिळणारी शौच साफ करणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नयेत.

गुदद्वाराचे आजारही दुर्लक्षित करू नका

पाईल्स, फिशर आणि फिस्ट्युला यांसारखे गुदद्वाराचे आजार अनेकदा संकोचामुळे लपवले जातात. मात्र वेळेवर प्रोक्टोस्कोपी किंवा सिग्मॉइडोस्कोपी करून निदान केल्यास हे आजार औषधोपचाराने बरे होऊ शकतात. केवळ १५ ते २० टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज पडते.

तज्ज्ञांच्या मते, पोटाशी संबंधित कोणताही त्रास दीर्घकाळ टिकत असल्यास तो दुर्लक्षित न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar