हे एक बैठकस्थितीतील आसन आहे. हे आसन करताना प्रथम जमिनीवर बसावे. नंतर दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर घेऊन पसरवावे. श्वास घेत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडावेत.मग दोन्ही पाय साधारण एक ते दीड फुट जमिनीपासून वर घ्यावेत आणि कुंभक करावा. हे आसन करताना आपले पाय आणि आपले हात दोन्ही सरळ रहायला हवेत. आपले सीट हे जमिनीला टेकलेले असते पण पाय आणि हात मात्र पसरवलेले आणि घट्ट पकडलेले तरंगते असतात. दमल्यासारखे वाटल्यावर श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर घ्यावेत. हे आसन तसे करायला अवघड आहे कारण यामध्ये जमिनीपासून पाय वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे तोलात्मक आसन करावे. सुरूवातीला दोन्ही पाय उचलून ताठ फाकवलेल्या अवस्थेत ठेवणे अवघड जाते पण हळूहळू सरावाने स्थितऊर्ध्वपादविस्तृत स्थिती घेता येते. ( urdhva paschimottanasana benefits )
या आसनाचे फायदे अनेक आहेत. आपल्या हातापायांची शक्ती वाढते. हाता-पायांना बळकटी येते. गुडघे, पोटऱ्या, मांड्या, जांघ, घोटे तसेच गुप्तांगालासुद्धा व्यायाम मिळतो. ज्यांना अचानक खोकला किंवा शिंक आल्यावर मुत्रवृद्धीचा विकार जडतो त्यांनी हे आसन जरूर करावे. या आसनाच्या नित्य सरावाने शरीरात शक्तीचा संचार वाढतो. शरीर बलवान होते.शरीराचा काम करण्याचा उत्साह वाढतो.
पचन क्रिया सुधारते कारण पाठ, नाभी आणि पोटाला चांगल्याप्रकारे ताण बसल्याने तेथील ग्रंथींचे कार्य सुधारते. पाठीला म्हणजेच मज्जारज्जूला व्यायाम मिळतो. ज्या स्त्री-पुरूषांना संभोगक्रियेचा आनंद मिळत नाही व त्यामध्ये अडचणी येतात त्यांनी हे आसन रोज नियमित करावे. स्त्री-पुरूषांच्या सेक्स्युअल समाधानासाठी आणि चांगल्याप्रकारे संतती प्राप्त होण्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरूषांची गुप्तांगे योग्य प्रकारे विकसित होणे अतिशय गरजेचे आहे. त्यादृष्टीने वंध्यत्व नाश करणारे हे आसन आहे. ज्यांची पोटाची, गुडघ्याची, पाठीची ऑपरेशन्स झाली असतील त्यांनी हे आसन डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय करू नये. करायला सोपे पण उत्कृष्ट परिणाम साधणारे हे आसन करताना श्वसनाची पथ्थे पाळणे गरजेचे आहे. ( urdhva paschimottanasana benefits )
सुरूवातीला श्वास घेत पायाचे अंगठे पकडावेत. मग श्वास घ्यायचाही नाही आणि सोडायचाही नाही म्हणजेच कुंभक स्थितीत पाय जमिनीपासून उचलायचे आहे. त्याचप्रमाणे श्वास सोडत पूर्वस्थिती घ्यायची आहे. एकंदर काय सेक्स्युअल अडचणी सोडवणारे आणि शरीरसुखाचा आनंद देणारे हे आसन आहे. त्याचप्रमाणे हे आसन करताना आपले शरीर उत्साहवर्धक होते. शरीरात स्फुर्ती येते. शक्ती वाढते. पण एकदम झटका देऊन आसन करूनही गुडघे, पोटऱ्या, मांड्या यांना जरी चांगला ताण मिळत असला तरी पाय उचलून तोल सांभाळायचा असतो. सुरूवातीला साधा बैठकस्थितीत फक्त पाय लांब करून ते थोडे थोडे उचलण्याचा ज्येष्ठांनी सराव करावा आणि मग उर्ध्वपाद विस्तृतस्थिर अवस्था घेताना योगतज्ञांचे मार्गदर्शन आवश्य घ्यावे.. ( urdhva paschimottanasana benefits )