आजकाल बहुतेक लोक हे वजन वाढल्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत म्हणजेच पोट सुटल्याची तक्रार अनेक लोक करत असतात. त्यांच्या पोटावर आणि कमरेवर चरबी जमा झाल्यामुळे वजन वाढलेले दिसते, ज्यामुळे शरीर बेडोल दिसते आणि वजन वाढल्यामुळे इतर अनेक आरोग्यविषयक समस्या डोके वर काढतात. येथे काही फायदेशीर टीप्स देण्यात आल्या आहेत ज्या वापरून तुम्ही पोटावरील चरबी दूर करू शकता.
येथे आम्ही तुम्हाला जो उपाय सांगत आहोत तो केल्यामुळे केवळ 10 दिवसांत पोटाची चरबी वितळेल, ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल, तेही नैसर्गिक पद्धतीने. कोणतीही शस्त्रक्रिया न करता किंवा कोणतेही केमिकलयुक्त औषध न घेता. यासाठी तुम्हाला एक चूर्ण खावे लागेल. हे चूर्ण तुम्ही घरी बनवू शकता, ते ही अगदी कमी खर्चामध्ये. यासाठी तुम्हाला तीनच पदार्थ गरजेचे आहेत, जे तुम्हाला घरामध्येच सहज उपलब्ध होतील.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तीन औषधी
जवस किंवा अळसी :
हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कारण यामध्ये ओमेगा-3 फैटी ऍसिड आणि फाइबर भरपूर प्रमाणात असते. याच्या वापरासाठी जवस गरम करावी.
जिरा :
सुकलेला जिरा घ्यावा. जर तुम्हाला वाटले की हे थोडे ओलसर आहे तर तुम्ही त्यास ऊनात सुकवू शकता. जिरा मेटाबॉलिज्म बुस्ट करते आणि इम्यून सिस्टम मजबूत करते. वजन कमी करते.
ओवा किंवा अजवाइन :
ओवा हा पोटासाठी फायदेशीर असतो. हे चरबी कमी करण्यासाठी मदत करते.
कृती :
हे चूर्ण बनवण्यासाठी तुम्हाला 3 चमचे जवस, 2 चमचे जिरा, 2 चमचे ओवा घ्यावे लागेल. जवसचे बीज, ओवा आणि जिरा या वस्तू व्यवस्थित सुकलेल्या असाव्यात. आता यांची बारीक पावडर करून चूर्ण तयार करावे. हे चूर्ण पोटाची चरबी वेगाने विरघळवते.
सेवन करण्याची पद्धत
हे चूर्ण घेताना लक्षात ठेवायचे आहे की तुम्हाला जेवण जेवण्याच्या आधी आणि नंतर कोमट पाणीच प्यायचे आहे. याच सोबत संपूर्ण दिवस पुरेसे पाणी प्यावे. एक चमचा चूर्ण कोमट पाण्याच्या सोबत दररोज नाश्ता करण्याच्या अगोदर घ्यायचे आहे. दररोजच्या वापरामुळे पोटाची चरबी 10 दिवसांत कमी झाल्याचे दिसून येईल. जर अधिक जास्त वेगाने परिणाम पाहिजे असेल तर हा उपाय दिवसातून दोन वेळा करू शकता. एक चमचा सकाळी नाश्ता करण्याच्या अगोदर आणि एक चमचा रात्री जेवण जेवण्याच्या अगोदर असे घेऊ शकता. चूर्ण घेताना या गोष्टीकडे लक्ष ठेवा की तुम्हाला यादरम्यान थंड प्रवृत्ती असलेल्या वस्तू खाव्या लागतील कारण जवस ही प्रवृत्तीने गरम असते.
वजन कमी करण्यासाठी अन्य उपाय योग आणि एक्सरसाइज :
जवळपास 10-20 मिनिटं कार्डीयो एक्सरसाइज करा, यामुळे वजन लवकर कमी होते, जर तुम्ही क्रंच नाही करू शकत असाल तर हे व्यायाम करा ज्यामुळे फॅट बर्न होईल. विंडमिल, टर्किश सिटअप्स, रस्सीवरच्या उड्या आणि सोबतच योग करावा.
कॅलरीवाल्या वस्तू खाऊ नये : वजन कमी करायचे असेल तर हाय कॅलरी असलेल्या वस्तू बिलकुल खाऊ नये. भाज्या आणि फळांचे सेवन करावे. कारण यामध्ये कॅलरी कमी असतात आणि फळांमध्ये केळे आणि चिकू यांचे सेवन करू नये कारण यामध्ये जास्त कॅलरी असतात.
गाजर : गाजर शरीरात चरबी वाढवण्यास विरोध करते आणि पोटाची चरबी कमी करते. रोज जेवणा अगोदर 1 किंवा 2 गाजर खावे यामुळे तुम्हाला जास्त भूक लागणार नाही आणि तुम्ही कमी जेवण जेवाल. ज्यामुळे शरीराला कमी कॅलरी मिळतील आणि तुमचे वजन कमी होईल.
जंक फूड खाऊ नये : जंक फूड, शुगर उत्पादने आणि तळलेले पदार्थ कमीतकमी खावे. यामुळे वजन वेगाने वाढते आणि सोबतच इतर आजार होतात.
दही : रोज जेवणासोबत दही खावे. रोज दही खाण्यामुळे पोटाची चरबी वितळून निघून जाते आणि रोज पुदिना असलेला चहा प्यावा यामुळे बाहेर आलेले पोट आतमध्ये जाते.
फॅट बर्नर म्हणजे काय?
फॅट बर्नर म्हणजेच चरबी कमी करणाऱ्या गोळ्यांमुळे शरीराचा उष्मांक वाढतो, पचन कमी केले जाते, व्यायामाशिवाय वजन कमी होते, वाढते असे दावे, अशा गोळ्या बनविणाऱ्या कंपन्या करत असतात. त्यांच्या मते, फॅट बर्नर्स हे आजच्या समाजामध्ये फारच लोकप्रिय होत आहेत. आजच्या तरुण पिढीतच नव्हे तर मध्यमवयीन व्यक्तींमध्येही फॅट बर्नर्सच्या गोळ्या घेऊन त्यांच्या जाहिरातींमधील युवक- युवतींप्रमाणे शारीरिक कष्टांशिवाय स्लीम दिसण्याची तीव्र इच्छा दिसून येत आहे. दहा दिवसांमध्ये तीन पौंड वजन घटविण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांना अशा मार्गाने वजन घटविण्याने, चामडी बरोबरच आपल्या पचनशक्तीवर, स्नायूंच्या क्षमतेवर याचा विपरीत परिणाम होणार आहे, याची यत्किंचितही जाणीव दिसत नाही.
अशा फॅट बर्नर गोळ्या घेतल्याने खरोखरीच चरबी कमी होते? दोन अडीच हजारांची ही औषधे ग्राहकाला खरंच समाधान देतात? भारतात नसेल कदाचित, पण युरोपमधील शास्त्रज्ञ या विषयावर संशोधन करत आहेत. फॅट बर्नर म्हणजे चरबी कमी करणाऱ्या गोळ्यांमुळे शरीराचा उष्मांक वाढतो. पचन कमी केले जाते. व्यायामाशिवाय वजन कमी होते. क्रयशक्ती वाढते असे दावे, अशा गोळ्या बनविणाऱ्या कंपन्या करत असतात. हे दावे कितपत खरे आहेत, हे आता पाहू.
क्रयशक्ती आणि उष्णतेच्या वहनाचे नियम प्रथम समजून घेऊ या. व्यक्ती तितक्या प्रकृती! या म्हणीप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीच क्रयशक्ती म्हणजे जगण्यासाठी, दिवसभरामध्ये शरीरातून खर्च होणाऱ्या आणि अन्नातून मिळविल्या जाणाऱ्या कॅलरिज, ज्यांचा स्नायूंच्या क्षमतेवर अनुकूल-प्रतिकूल परिणाम होत असतो. क्रयशक्तीचा अर्थ समजला की, उष्णतेच्या वहनाचा नियम समजणे अवघड नाही. तुम्ही कमी कॅलरिज मिळविल्या तर तुमचे वजन घटणार आहे.
म्हणजे जास्त कॅलरिज मिळाल्या तर वजन वाढणार! याचा अर्थ वजन कमी करावयाचे असेल तर कॅलरिज कमी घ्या! असा होतो, पण कॅलरिजच्या जमा-खर्चाचा फरक शरीराच्या सहनशक्तिपलीकडे गेला तर तुम्ही बारीक नव्हे तर हडकुळे दिसाल. भूकबळीची ही अवस्था असेल. कांतीवरील तेज नाहीसे होईल, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, डोळे खोल जातील. हाडे दिसू लागतील, लोक तुम्हाला, ये क्या हालत बना रखी है। कुछ लेते क्यो नही? असे विचारू लागतील. तर या कंपन्या म्हणतात की, फॅट बर्नर घेण्याने तुमची क्रयशक्ती वाढेल. म्हणजे या गोळ्या तुमच्या कॅलरीज खर्च करतील. महत्त्वाची बाब अशी की, त्याचे प्रमाण तितके जास्त असत नाही.
मध्यंतरी एका कंपनीने जाहिरात केली की, त्यांच्या चहाच्या अर्काचा वापर केला तर चार टक्के कॅलरीज खर्च होतात. ऐकायला छान वाटते नाही! याचा अभ्यास करताना असे दिसते की, जर तुमच्या क्रयशक्तीमुळे दिवसात दोन हजार कॅलरीज खर्च होत असतील. एक पौंड फॅट साडेतीन हजार कॅलरीजची असेल तर दिवसाला ऐंशी कॅलरीजच्या हिशेबाने चव्वेचाळीस दिवस हा चहाचा अर्क घेतल्यावर तुमची एक पौंड चरबी कमी होईल. एक पौंड चरबी कमी करण्यासाठी दररोजच्या आहारातून तेल, तूप आणि गहू कमी करा आणि पंधरा दिवसांत फरक पाहा! एक पौंडापेक्षाही वजन कमी झालेले दिसेल!
पचन कमी करणे, वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवल्याने कॅलरीज कमी होऊन चरबी कमी केली जाते. बहुतेक लोकांना हे नियंत्रण शक्य होत नसल्याने कंपन्या जाहिरात करताना आमच्या गोळ्यांमुळे भूक मंदावते! असा सरसकट दावा करताना दिसतात. या गोळ्यांमधील काही घटक तुमची भूक मंद करू शकतात; पण त्यासाठी भूक लागल्यावर भरपूर पाणी पिणे, तंतुमय आहार घेणे, कमी कॅलरीज असलेले अन्न उदाहणार्थ भाकरी, उसळी, पालेभाज्या अशा आहारांतून कॅलरिजचे प्रमाण कमी होते, प्रोटिन्सचे प्रमाण वाढते आणि वजन कमी होण्यास मदतही होते.
शक्ती आणि दृष्टी :
वजन कमी करण्याच्या औषधांमुळे दुप्पट जोम आणि विचार करण्याची नवी दृष्टी मिळेल, असेही या कंपन्या सांगतात. खरे तर या दोन्ही गोष्टी मानसिकतेशी निगडित असतात. आपण सडपातळ दिसलो तरच, स्मार्ट दिसणार आहोत! या विचारानेच तर लोक ही औषधे घेत असतात. कृष शरीर म्हणजेच सडपातळ शरीर अशी केवळ भावना झाल्याने मनुष्याला दुप्पट जोम येणे शक्य आहे? व्यायामानंतर होणारा मोकळा श्वास, उल्हासित होणारे, मनाला येणारा शांतपणा, वाढलेला आत्मविश्वास ज्यांनी अनुभवला आहे, तेच हे जाणू शकतात की, खरी शक्ती जोम हे सगळे व्यायामाशी निगडित आहे. आता आपण स्वाभाविकपणे विचारणार की, ही औषधे मग घेऊच नयेत काय? व्यायाम करण्यासाठी लागणारा वेळ देण्याची आजकाल फार कोणाची तयारी नाही.
आपल्या सौंदर्य, स्मार्टनेस आणि सुखाच्या कल्पनाच मुळी चुकीच्या गृहितकांवर आधारित आहेत. एखाद्या गोऱ्या, सडपातळ शरीराला पाहिले, ते आवडले की, आपण त्यालाच सुंदर किंवा स्मार्ट ठरवतो. त्याप्रमाणे आपण दिसावे अशी स्वप्ने पाहातो आणि त्यासाठी कसलेही कष्ट न करता पैसे फेकून ते मिळावे, अशी अपेक्षा करतो. बाजारात आपल्या स्वप्नांची इनकॅशमेंट करणारी मंडळी आहेतच. ते आपल्याला सडपातळ दिसण्याचे, गोरे दिसण्याचे इन्स्टंट मार्ग सांगतात. आपण त्याला भाळतो आणि शरीराची न भरून येणारी नासाडी करून घेतो. सडपातळ दिसण्याच्या औषधांमुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावल्याने, लघवीच्या वाटे हे पाणी निघून जात राहण्याने, किडनीवर याचा परिणाम होऊ शकतो, सकृतदर्शनी वजन कमी होताना दिसते, मात्र, प्रत्यक्षात शरीरातील पाण्याची पातळी अतिशय कमी झालेली असते.
अचानक प्रचंड थकवा येणे, जीभ आत ओढणे, लाळ सुटणे, अंधारी येणे, धडधड वाढणे, कंपवात अशा तत्कालिक परिणामांपासून, चामडी कोरडी पडणे, स्नायू शैथिल्य, अंगावर उष्णतेचे फोड येणे, पापण्या व डोळ्यांचा खालचा भाग काळा पडणे, किडनीचे कार्य बंद पडणे, हार्ट ऍटॅक इथपर्यंत काहीही घडू शकते. मध्यमवयीन व्यक्तींमध्ये हे परिणाम लवकर जाणवतात. मग ही औषधे घेऊच नयेत काय? असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर असे आहे की, नियमित व्यायाम, पोटभर सकस आहार घेणाऱ्या व्यक्तींना या औषधांचा अतिशय चांगला अनुभव येतो. शरीराची कसलीही हानी न होता वजन कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम, भक्कम आहार आणि जोडीला जर फॅट बर्नर्स असतील तर, चार महिन्यांत तुम्ही सहा ते आठ किलो वजन कमी करू शकता!!!
तजेलदार कांती, स्वच्छ डोळे ही निरोगीपणाची दिसणारी लक्षणे असून पचनक्षमता, सक्षम रुधिराभिसरण ही स्वत:ला जाणवणारी लक्षणे आहेत. तर चपळता, कार्यक्षमता ही प्रतित होणारी लक्षणे आहेत. मज्जासंस्था ही शरीराची हालचाल करविणारी, भावभावना व्यक्त करणारी अशी यंत्रणा आहे. तिच्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या दोषांचे शरीरावर गंभीर परिणाम होत असतात. आपण जे अन्न खातो त्यामधून शरीराला व्हिटॅमिन्स व क्षार जे मिळतात ते प्रामुख्याने या मज्जासंस्थेच्या कार्यासाठी वापरले जात असतात. यावरच या संस्थेचे कार्य आणि क्षमता अवलंबून असते.
मज्जासंस्था कार्यक्षम राहण्यासाठी जी व्हिटॅमिन्स काम करतात त्यातील एक महत्त्वाचे व्हिटॅमिन म्हणजे बी कॉम्प्लेक्स. व्हिटॅमिन बी 12 हे व्हिटॅमिन मज्जातंतू निर्मिती होण्यासाठी अत्यंत आवश्यक असे व्हिटॅमिन आहे. कोबाल्ट घटक असलेल्या या व्हिटॅमिनच्या कमतरतेने मणक्यांची झीज होते. बी 9 व्हिटॅमिन म्हणजेच फोलिक ऍसिड, मज्जासंस्थेच्या संदेश वहनामध्ये फोलिक ऍसिडचे कार्य महत्त्वाचे आहे.
-डॉ. शीतल जोशी