Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

शांत झोप मिळत नाही?

by प्रभात वृत्तसेवा
April 22, 2021
in आरोग्यपर्व
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

दिवसभराची दगदग आणि पुन्हा दुस-या दिवसाचा ठरलेला व्यग्र दिनक्रम या दोन्ही गोष्टींमधील महत्त्वाचा भाग आणि गमावलेल्या ऊर्जेला कमवण्याचा मुख्य स्रेत म्हणजे शांत झोप. मात्र कित्येक जणांना काळजी, चिंता, वाद अशा कोणत्याही कारणांमुळे ही शांत झोप मिळत नाही. अशी शांत झोप हवी असेल तर आपल्या दिनचर्येत काही बदल करणं आवश्यक आहे.

आजकाल बरेच जण रात्री झोप लागत नसल्याची तक्रार करत असतात. काही जणांच्या डोक्यात विचार असतात किंवा काळजीने ग्रस्त असतात अशा माणसांच्या झोपेवर परिणाम होतो. तर काही जणांना रात्री अपरात्री जागायची सवय असते. दररोज जागरण केल्याने झोपेवर तर परिणाम होतोच मात्र पुरेशी झोप न मिळाल्याने त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो म्हणूनच शांत झोप लागण्यासाठी काही उपाय करून बघा.

झोपण्याची एक निश्चित वेळ ठरवा. रात्री झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटं बाहेर फिरून या. लिखाणाची किंवा वाचनाची सवय असेल तर त्यासाठी जेवणाआधी वेळ काढा. रात्री झोपायच्या आधी वाचायची सवय असेल तर तर्कशुद्ध वाचायची सवय ठेवा
अतिशय दु:खद किंवा उत्सुकतेचं वाचन झोपण्यापूर्वी करू नये.

झोपण्याच्या जागी गोंगाट होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला गोंगाट थांबवणं शक्य नसेल तर कानात कापसाचे बोळे घालून झोपा. कोणत्याही प्रकारची औषधं घेत असाल तर त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्या. जिथे शांत झोप येईल किंवा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला झोप येईल अशा जागेची निवड करा किंवा तशा वस्तू तुम्ही तुमच्या खोलीत सजवा.
तुमची उशी खूप हलकी किंवा खूप जड असू नये.

झोपण्याच्या खोलीत हवा खेळती राहील याची काळजी घ्या. भरपूर किंवा अतिशय कमी पांघरूण घेऊ नका. पलंगावरील गादी जास्त दबली जाणारी नसावी. तसंच झोपण्याकरता पुरेसा मोठा पलंग असावा. रात्री घालायचे कपडे सैल असावेत. ते घट्ट असून नयेत
ज्यांना वाद घालण्याची सवय असते अशा माणसांशी रात्रीच्या वेळी बोलणं शक्यतो टाळावंच.

रात्रीच्या जेवणात आणि त्यानंतर खाल्ल्या जाणा-या कोणत्याही पदार्थात मीठ असणार नाही याची काळजी घ्या. ज्या पदार्थातून कॅल्शिअम मिळेल अशा पदार्थाचं सेवन करा. काही जणांना झोपण्याच्या खोलीत मंद उजेड हवा असतो तर काही जणांना काळोख हवा असतो. असं असल्यास झोपण्याच्या खोलीत त्याप्रमाणे सोय करावी.

काहीही झालं तरी ठरावीक वेळेतच उठायची सवय ठेवावी. दुपारी झोपणं टाळावं. दररोज एखाद्या प्रकारची कवायत करा म्हणजे दिवसभराचा थकवा निघून जाईल. झोपण्यापूर्वी किमान दोन तास व्यसनाच्या आहारी जाऊ नका तसंच कॉफी किंवा चहा पिऊ नये.
झोपण्यापूर्वी टीव्ही पाहायची सवय असेल तर शक्यतो मालिका टाळून विनोदी कार्यक्रम पाहावेत.

झोपण्यापूर्वी तुम्हाला आवडेल असं मंद संगीत ऐकावं. म्हणजे छान झोप लागेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्यायला विसरू नका. एक कप पाण्यात एक चमचा मध घालून प्यायल्यास चांगली झोप लागते. चार ते सहा तास झोपही शरीराला पुरेशी असते. त्यामुळे जास्त झोपणं टाळावंच.

रात्री पलंगावर पडल्या पडल्या तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ दिवसभरातल्या घडामोडींवर विचार करणं टाळावं. झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय असेल तर त्या पाण्यात बेकिंग सोडा आणि राईची पावडर घालावी. पलंगावर गेल्यावर प्रत्येक स्नायूंना आराम द्यावा. म्हणजे आराम पडतो. झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात घडलेल्या आनंदी घटनेचा विचार करत झोपा.

Tags: arogya jagarhealthsound sleeptips
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar