सुका मेवा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते बदाम, काजू, अंजीर, पिस्ता. पण सगळ्यात पहिले नाव येत ते “बदाम’ आपल्याला एखादी गोष्ट आठवत नसेल, तर आपल्याला बदाम खा असे सांगतात. का म्हटलं जाते याचा विचार केला का? बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे नेहमी म्हटले जाते. पण बदाम खाल्ल्याने स्मरणशक्तीसह अनेक फायदे होतात.
1.बदाम शरीरातील रक्त पातळी वाढवण्यास मदत करतात. म्हणून बदाम हे सालासकट खाल्ले पाहिजे.
2.दररोज बदाम खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर व नियंत्रणात ठेवायचे असेल तर बदामाचे सेवन करावे.
3.बदामाचे नियमित सेवन करा. कॅन्सरला दूर करा. बदामामधील ऍटीऑक्सिडंट आजारांना दूर ठेवतात.
बदामामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. जर डायबिटीस असेल तर बदाम दररोज खावे.
4.शरीरासाठी अनावश्यक असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यास हृदयविकारचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
5.बदामाचे हेल्दी फॅटस्, प्रोटीन, मॅग्निशियम, व्हिटॅमिन ई असते.
6.जर तुम्हाला अवेळी भुक लागत असेल व भुक नियंत्रणात राहात नाही. भुकेच्यावेळी बदाम खाल्ले तर तुमची भूक नियंत्रणात राहील.
7.बदाम बुध्दी तल्लख करण्याचे काम करते. बदाम खाल्ल्याने गोष्टी चांगली लक्षात राहतात. लहान मुलांना बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.
8.बदामाच्या तेलाचा वापर करून कोरडी त्वचा मुलायम करता येईल.
9.केस गळत असतील तर बदाम केस गळती रोखून केसांच्या वाढीला मदत करते.
10.बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन “ई’ तुमच्या डोळ्याच्या तक्रारी दूर करते.
डॉ आदिती पानसंबळ, आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.