Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Smartphone Safety Features: अडचणीच्या वेळी जीव वाचवू शकतात मोबाईलमधले हे ५ सेफ्टी फीचर्स

by
February 9, 2026
in लाईफस्टाईल
A A
Smartphone Safety Features: अडचणीच्या वेळी जीव वाचवू शकतात मोबाईलमधले हे ५ सेफ्टी फीचर्स
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Smartphone Safety Features: दिल्लीमधून समोर आलेले ताजे आकडे अत्यंत धक्कादायक आहेत. जानेवारी २०२६च्या पहिल्या १५ दिवसांत ८००हून अधिक लोक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदल्या गेल्या, यामध्ये महिलांची आणि मुलींची संख्या जास्त आहे. ही परिस्थिती आपल्यासाठी एक मोठा इशारा आहे.

आपण नेहमी बाहेर जाताना सावध राहण्याबद्दल बोलतो, पण आपल्या खिशात असलेला स्मार्टफोन हा केवळ कॉल किंवा सोशल मीडियासाठी नाही, तर संकटाच्या वेळी जीव वाचवणारे साधनही ठरू शकतो, हे अनेकदा विसरतो.

आजच्या घडीला प्रत्येकाने आपल्या फोनमधील हे ५ महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स नक्की ऑन करून ठेवायला हवेत.

1) इमरजन्सी SOS फीचर

हे फोनमधील सर्वात महत्त्वाचं सेफ्टी फीचर आहे. संकटात सापडलात तर एका बटणावर मदत मिळू शकते. iPhone मध्ये फोनचा साइड (पॉवर) बटन सलग ५ वेळा दाबा. लगेचच पोलिस किंवा अँब्युलन्सला कॉल जाईल आणि तुमची लोकेशन घरच्यांना पाठवली जाईल.

Android फोनमध्ये,
Settings → Safety & Emergency → SOS ऑन करा. यानंतर पॉवर बटन ३ किंवा ५ वेळा दाबल्यास, तुमच्या निवडलेल्या संपर्कांना तुमची लाईव्ह लोकेशनसह मदतीचा मेसेज जाईल.

2) लाईव्ह लोकेशन शेअरिंग

अनोळखी कॅबमध्ये बसताना किंवा सुनसान रस्त्यावरून जाताना लाईव्ह लोकेशन घरच्यांना शेअर करा.
iPhone वापरकर्ते – Find My अ‍ॅप
Android वापरकर्ते – Google Maps मधील Location Sharing

लाईव्ह लोकेशनमुळे तुम्ही सध्या कुठे आहात आणि कुठे जात आहात हे सतत कळत राहतं.

3) 112 इंडिया अ‍ॅप

भारत सरकारचं 112 India App प्रत्येकाच्या फोनमध्ये असायलाच हवं. या अ‍ॅपमध्ये फक्त एक बटन दाबलं की पोलिस, फायर ब्रिगेड किंवा अँब्युलन्सला तुमची अचूक लोकेशनसह मदतीचा संदेश जातो. कॉल करायला वेळ नसेल, तेव्हा हे अ‍ॅप फार उपयोगी ठरतं.

4) क्रॅश डिटेक्शन आणि सेफ्टी चेक

नवीन स्मार्टफोनमध्ये क्रॅश डिटेक्शन फीचर असतं. मोठा अपघात झाल्यास फोन आपोआप इमरजन्सी सेवांना कळवतो. Android फोनमध्ये Personal Safety / Safety Check फीचरही असतं. यामध्ये तुम्ही टाइमर सेट करू शकता. ठराविक वेळेत फोनवर प्रतिक्रिया दिली नाही, तर फोन आपोआप अलर्ट देतो आणि तुमच्या घरच्यांना कळवतो.

5) मेडिकल आयडी

फोन लॉक असतानाही दिसेल अशी मेडिकल माहिती सेव्ह करून ठेवा. ब्लड ग्रुप, इमरजन्सी कॉन्टॅक्ट नंबर, महत्त्वाचे आजार (असतील तर) अपघात किंवा बेशुद्ध अवस्थेत ही माहिती इतरांना दिसू शकते आणि वेळीच मदत मिळू शकते.

लक्षात ठेवा

हे सर्व सेफ्टी फीचर्स आधीच ऑन असतील, तरच गरजेच्या वेळी उपयोगी पडतात. त्यामुळे आजच १० मिनिटं काढून स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या फोनमधील या सेटिंग्ज तपासा. थोडीशी काळजी आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापरच तुमची खरी सुरक्षा आहे.

 

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar