Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Sleep Debt: स्लीप डेटचा धोका: अपुरी झोप घेतल्याने वाढू शकतात गंभीर आजार

by
September 1, 2025
in लाईफस्टाईल
A A
Sleep Debt: स्लीप डेटचा धोका: अपुरी झोप घेतल्याने वाढू शकतात गंभीर आजार
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Sleep Debt: आरोग्य टिकवण्यासाठी जस संतुलित आहार व व्यायामाची गरज आहे, तशीच पुरेशी झोप घेणंही आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते एका निरोगी व्यक्तीने रोज किमान ७-८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत बहुतेक लोक केवळ ४-५ तासांचीच झोप घेतात. हीच सवय पुढे जाऊन ‘स्लीप डेट’ (Sleep Debt) या धोकादायक अवस्थेला कारणीभूत ठरते.

स्लीप डेट म्हणजे काय?

जेव्हा एखादा व्यक्ती सतत आवश्यक तासांपेक्षा कमी झोप घेतो, तेव्हा त्याच्या शरीरावर ‘झोपेचं कर्ज’ म्हणजेच स्लीप डेट जमा होतं. उदाहरणार्थ, एखाद्याला ८ तास झोप हवी, पण तो रोज फक्त ५-६ तास झोपतो, तर कालांतराने शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.

कमी झोपेचे परिणाम

मानसिक आरोग्य: चिडचिड, ताण, नैराश्य (डिप्रेशन), लक्ष केंद्रीत करण्यात अडचण

स्मरणशक्तीवर परिणाम: विस्मरण व लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होणे

शारीरिक समस्या: हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे

सतत थकवा: दिवसभर झोप येणे, कामात मन न लागणे, सुस्ती

स्लीप डेट टाळण्याचे सोपे उपाय

1. झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा वापर टाळावा.

2. रात्री झोपण्याच्या ४-६ तास आधी चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक घेऊ नयेत. हलका आहार घ्यावा.

3. झोपेचं वातावरण शांत, अंधारात आणि थंड ठेवा. आरामदायी गादी व उशी वापरा.

4. झोपण्यापूर्वी ध्यान, डीप ब्रीदिंग किंवा हलकी स्ट्रेचिंग करावी.

5. जर रात्री झोप कमी झाली तर दिवसा २०-३० मिनिटांचा ‘पॉवर नॅप’ घ्या.

6. नियमित व्यायाम करा, पण झोपण्यापूर्वी जड व्यायाम टाळा.

तज्ज्ञ सांगतात की, योग्य झोप घेतली नाही तर शरीर आणि मन दोन्हीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, पुरेशी झोप घेणं ही प्रत्येकाची आरोग्याची गरज आहे.

Join our WhatsApp Channel

The post Sleep Debt: स्लीप डेटचा धोका: अपुरी झोप घेतल्याने वाढू शकतात गंभीर आजार appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar