Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Skin Care Tips: त्वचा उजळण्यासाठी योग्य वेळ कोणती? दिवस की रात्र… जाणून घ्या स्किन केअरचा खरा फॉर्म्युला!

by
March 9, 2026
in लाईफस्टाईल
A A
Skin Care Tips: त्वचा उजळण्यासाठी योग्य वेळ कोणती? दिवस की रात्र… जाणून घ्या स्किन केअरचा खरा फॉर्म्युला!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Skin Care Tips: निरोगी आणि चमकदार त्वचा मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेक जण महागडे क्रीम, सीरम किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात; मात्र तज्ज्ञांच्या मते फक्त महागडी उत्पादने वापरणे पुरेसे नसते, तर स्किन केअर योग्य वेळी करणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्वचेच्या गरजा दिवस आणि रात्री वेगळ्या असतात, त्यामुळे दोन्ही वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.

तज्ज्ञ सांगतात की आपल्या त्वचेवर सर्केडियन रिदम म्हणजेच शरीराची जैविक घड्याळ पद्धत काम करत असते. दिवसाच्या वेळी त्वचा बाहेरील प्रदूषण, धूळ आणि सूर्याच्या किरणांपासून स्वतःचे संरक्षण करते, तर रात्रीच्या वेळी त्वचा स्वतःची दुरुस्ती आणि पुनर्निर्मिती करते. त्यामुळे दिवस आणि रात्रीचा स्किन केअर रूटीन समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. Skin Care Tips

दिवसाचा स्किन केअर रूटीन  (Skin Care Tips)

दिवसाच्या वेळी त्वचेवर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा, धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम होत असतो. त्यामुळे सकाळच्या स्किन केअरचा (Skin Care ) मुख्य उद्देश त्वचेचे संरक्षण करणे हा असतो.

सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे. रात्रीभर त्वचेवर जमा झालेले तेल आणि घाण काढून टाकण्यासाठी हलक्या फेसवॉशचा वापर करावा. त्यानंतर व्हिटॅमिन सी असलेले सीरम वापरल्यास त्वचेचे प्रदूषणापासून संरक्षण होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.

दिवसाच्या स्किन केअरमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सनस्क्रीन. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते, तसेच त्वचा लवकर वयस्कर दिसू लागते. त्यामुळे बाहेर जाताना किंवा घरात असतानाही सनस्क्रीन वापरणे आवश्यक मानले जाते. सनस्क्रीनमुळे टॅनिंग आणि त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते.

रात्रीचा स्किन केअर रूटीन  (Skin Care Tips)

रात्रीची वेळ त्वचेच्या दुरुस्तीसाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते. आपण झोपेत असताना त्वचेतील पेशींचे नूतनीकरण आणि पुनरुत्पादन सुरू असते. त्यामुळे रात्रीची त्वचा काळजी अधिक प्रभावी ठरते.

सर्वप्रथम दिवसभराचा मेकअप, धूळ आणि घाण पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यासाठी क्लींझर किंवा फेसवॉशचा  (Facewash) वापर करावा. त्यानंतर त्वचेच्या गरजेनुसार रेटिनॉल किंवा हायलूरोनिक अॅसिड असलेले प्रॉडक्ट्स वापरले जाऊ शकतात. रात्री सूर्यप्रकाश नसल्यामुळे त्वचा हे घटक अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेते. यानंतर चांगली नाइट क्रीम लावल्यास त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो आणि सकाळी चेहरा अधिक ताजातवाना दिसतो.

मग योग्य वेळ कोणती?

तज्ज्ञांच्या मते दिवस आणि रात्र दोन्ही वेळा स्किन केअरसाठी महत्त्वाच्या आहेत. दिवसाचा रूटीन त्वचेचे नुकसान होऊ देत नाही, तर रात्रीचा रूटीन त्वचेची दुरुस्ती करण्याचे काम करतो. जर तुम्ही रात्री चेहरा स्वच्छ न करता झोपलात, तर दिवसाभराची स्किन केअर मेहनत वाया जाऊ शकते.

चमकदार त्वचेचे रहस्य महागड्या उत्पादनांमध्ये नसून नियमित आणि योग्य स्किन केअरमध्ये दडलेले आहे. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार सकाळ आणि रात्रीचा एक ठरलेला रूटीन तयार करून तो किमान २१ दिवस सातत्याने पाळल्यास त्वचेतील सकारात्मक बदल दिसू शकतात.

 

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar