Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Skin care: ओठांचा नैसर्गिक गुलाबीपणा हरवतोय? या सवयी ठरू शकतात कारण

by
September 16, 2025
in लाईफस्टाईल
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Skin care: गुलाबी, मऊसर आणि हेल्दी दिसणारे ओठ प्रत्येकालाच आवडतात. पण काही लोकांचे ओठ सतत कोरडे किंवा काळसर दिसतात. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं आणि अनेकदा लाजिरवाणी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. ओठ काळे पडण्यामागे पिग्मेंटेशन ही मोठी समस्या मानली जाते. पिग्मेंटेशन म्हणजे त्वचेत जास्त प्रमाणात रंगद्रव्य तयार होणं. ही समस्या ओठांवर दिसू लागली तर त्यांना काळसरपणा येतो.

आज बाजारात महागड्या क्रीम्स, लिप बाम्स किंवा सोशल मीडियावर घरगुती उपाय सहज मिळतात. पण खरा उपाय म्हणजे ओठ काळे होण्यामागची कारणं समजून घेणं आणि ती सवयी बदलणं.

ओठ काळे पडण्यामागील कारणं

1. सनस्क्रीनकडे दुर्लक्ष

आपण चेहऱ्यावर सनस्क्रीन लावतो, पण ओठांकडे मात्र दुर्लक्ष करतो. उन्हाच्या तीव्र किरणांमुळे ओठांवर पिग्मेंटेशन वाढतं आणि ते हळूहळू काळसर होतात. त्यामुळे बाहेर पडताना लिप-सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे.

2. जास्त कॉस्मेटिक वापरणं

रोजच्या जीवनात लिपस्टिक वापरणाऱ्या अनेकजणी त्यातील केमिकल्सकडे लक्ष देत नाहीत. काही लिपस्टिक्समधील हानिकारक घटक ओठांच्या त्वचेला नुकसान पोहोचवतात आणि रंग बदलतात.

3. धूम्रपानाची सवय

स्मोकिंग ही केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर ओठांसाठीही घातक आहे. धूम्रपानामुळे ओठांवर हट्टी काळसरपणा येतो. सतत सिगारेटमधील निकोटीनशी संपर्क आल्याने ओठ गडद दिसू लागतात.

4. पाणी कमी पिणं

शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्वचा आणि ओठ कोरडे पडतात. यामुळे ओठांचा रंग बदलतो आणि ते राठ दिसतात. दिवसभर पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे.

5. अयोग्य आहार

फास्ट फूड, तेलकट पदार्थ आणि पोषणतत्त्वांची कमतरता असलेला आहार घेतल्यास शरीरावरच नव्हे तर ओठांच्या रंगावरही परिणाम होतो. पोषक तत्त्वांच्या अभावामुळे ओठांचा गुलाबी रंग हरवतो.

उपाय काय?

ओठांचा नैसर्गिक गुलाबीपणा टिकवण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात :

दररोज व्हिटॅमिन-ई युक्त लिप बाम वापरा.

ओठांना नियमित मॉइश्चराइज करा.

पुरेसं पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या.

लिंबाचा रस, मध, बीट यांसारख्या घरगुती उपायांचा वापर करा.

शक्यतो जास्त केमिकलयुक्त लिपस्टिक टाळा.

धूम्रपानाची सवय असेल तर ती सोडा.

सौंदर्याच्या दृष्टीने ओठ खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे थोडं लक्ष दिलं, तर नैसर्गिकरित्या गुलाबी आणि हेल्दी ओठ मिळवणं शक्य आहे.

Join our WhatsApp Channel

The post Skin care: ओठांचा नैसर्गिक गुलाबीपणा हरवतोय? या सवयी ठरू शकतात कारण appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar