खांद्याच्या वेदना क्षुल्लक दुखापतीमुळे होत असतील तर घरगुती उपचारांचा विचार केला जाऊ शकतो. तथापि त्याकडे दुर्लक्ष करू नये. खांदा सामान्य स्थितीत येण्यास काही दिवस लागतात. खांद्याच्या संरक्षणासाठी विश्रांती घ्यावी.( shoulder pain)
सूज व दुखणे बर्फाच्या शेकाने कमी होऊ शकते. खांद्याच्या संरक्षण व आधारासाठी सपोर्टिंग स्लींगचा वापर होऊ शकतो. सौम्य मालीश दुखणे बरे करण्यास मदत करू शकते, पण मार लागला असल्यास ते टाळावे. एक किंवा दोन आठवडे विश्रांती खांदा दुखीवर पुरेशी आहे, पण त्यापेक्षा जास्त विश्रांती घेऊ नये, कारण त्यामुळे खांद्याची हालचाल कमी होऊ शकते.( shoulder pain)
म्हणून खांद्याचे व्यायाम सुरु करणे आवश्यक असते. व्यायाम सोपे आहेत व ते सहजपणे इंटरनेटवर शोधले जाऊ शकतात. खांद्याच्या वेदना व सुजेवर औषधांद्वारे (ओवर द काऊंटर ) लवकर आराम मिळू शकतो. जर खांद्यावर शास्त्रक्रिया झाली असेल तर शस्त्रकियेनंतर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. वेदना आणि सूज कमी झाल्यावरच खेळांमध्ये सहभागाचा विचार होऊ शकतो. घरगुती उपचारांचा फायदा होत नसेल तर अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या. ( shoulder pain)